बाबा माझे Guardian Angel

।। ॐ श्री साई अनंत।।

बाबा ह्या शब्दातचं सर्व काही येऊन जातं. जसं आई ह्या शब्दात माया, ममता, प्रेमाची एक ऊब असते तशीच बाबा ह्या शब्दात मला धीर जाणवतो.  आपल्या पाठीशी एक GUARDIAN ANGEL असल्याची जाणीव येते.

अशीच जाणीव मला २००८ मध्ये झाली.

मी देवबाबांना २००७ मध्ये introduce झालो होतो. पण तेव्हा बाबांना असं पाहिलं नव्हतं (देवाच्या रुपात). नुपुरच्या घरात देवबाबांचं करतात, ती एक दैवी शक्ती आहे म्हणून मी त्यांना नमस्कार करायचो. मी तसा सहसा आपले मूळ देव सोडून दुसऱ्या देवस्वरूप व्यक्तींवर सहज विश्वास ठेवणाऱ्यातला नाही. पण मला माझ्या इंजिनीअरिंग च्या शेवटच्या वर्षाला असताना जेव्हा बाबांचा अनुभव आला त्यानंतर माझा त्यांच्यावर विश्वास जडला. नुपूरच्या आईंनी म्हणजे मम्मांनी (किर्ती दोंदे) देवबाबांनी सांगितलं म्हणून माझ्यासाठी पंचमुखी रुद्राक्षावर ११००० जप साधना करून मला गळ्यात घालायला दिला. आता मी तो नुसताच रुद्राक्ष म्हणून घातला आणि त्याहून जास्त नुपुरच्या आईंनी फक्त आपल्यासाठी ह्यावर एवढा जप केलाय म्हणून त्यांच्या श्रद्धेला एक appreciation म्हणून घातला. (ह्या रुद्राक्षाशी निगडित अनुभव पुढे येईलच.)

Continue reading “बाबा माझे Guardian Angel”

बाबा माझ्या आयुष्यातले अविभाज्य भाग

|| श्री ||

अंदाजे ३ वर्षाआधी बाबांची साथ मिळाली आणि त्या नंतर पुन्हा कधीही एकटी आहे असं वाटलंच नाही…..

मला जेव्हा पहिल्यांदा बाबांनी त्यांच्या समोर बसून मनातलं सांगायला सांगितलं, शब्द कमी आणि रडू जास्त अशी परिस्थिती होती कारण त्या क्षणी कोणी आपल्याबद्दल इतक्या प्रेमाने विचार करतंय हेच माझ्यासाठी खूप होत. 

माझं लग्न २०१४ मध्ये झालं, तरीही मला काही USA ला जाण्याचा योग येत नव्हता, त्याने आमच्या वैवाहिक जिवनात खूप दुरावा आणि तणाव येऊ लागला होता. परिस्थिती खूप गुंतत घटस्पोटापर्यंत पोहोचली होती, त्या तणावामुळे मला खूप नैराश्य येऊ लागलं होत. आणि तेव्हाच बाबांनी हात धरून मला त्या परिस्थितीमधून बाहेर काढलं. पहिले तर आमची कुलस्वामिनी कोण ते बाबांमुळे कळलं. गेले ३० वर्ष आपली कुलस्वामिनी कोण हे माहित नसताना आज बाबांमुळे तिची पूजा आमच्या घरी होतेय. बाबांनी माझ्या कडून माझ्या कुलस्वामिनीची इतकी सेवा भक्ती करून घेतली आहे कि आज बाबांसोबत तिचीहि खूप कृपा आहे माझ्यावर. हे सगळं बाबांमुळे शक्य झालं आहे. 

Continue reading “बाबा माझ्या आयुष्यातले अविभाज्य भाग”

बाबांच्या कृपेने नवे घर

|| श्री ||

माझे चुलत दिर व जाऊबाई यांच्या प्रोत्साहनामुळे मी श्री. देवबाबाच्या दर्शनाला जाण्याचे ठरवले आणि तो दिवस होता १३ एप्रिल २०१४. तो दिवस बाबांच्या उत्सवाचा होता. देवबाबांच्या दर्शनाचा लाभ झाला आणि त्या वर्षापासून आम्हाला गुरुपौर्णिमा, नवरात्र, आणि इतर उत्सवांना जायची इच्छा व्हायची आणि कितीही अडचणी आल्या तरी आमची इच्छापूर्ती व्हायची.

आमचे धुळ्याचे घर विकून इथे आम्हाला स्वतःचे नवीन घर घ्यायची इच्छा होती पण त्यात प्रत्येक वेळी काही ना काही अडचणी येत गेल्या आणि व्यवहार होत नव्हता. दोन वर्ष खटाटोप करून सुद्धा काहीच मार्ग दिसेना. २०१६ च्या गुरुपौर्णिमेला मी देवबाबांकडे प्रार्थना केली आणि काय आश्चर्य आम्ही पुढच्या गुरुपौर्णिमेला नवीन घरातून बाबांच्या दर्शनाला गेलो. नवीन घराच्या वास्तुशांतीला सुगंधित रूपात येऊन बाबांनी आशीर्वादही दिला.

छोट्या-छोट्या कुठल्याही इच्छा मनात आल्या आणि बाबांचे नामस्मरण केले कि इच्छापूर्ती होतेच. अशीच कृपा बाबांची आमच्यावर सदैव राहो हीच चरणी प्रार्थना.

|| ओम साई श्री साई जय जय साई राम ||

-सौ, सीमा समीर गुप्ते, मोशी, पिंपरी-चिंचवड

बाबांच्या कृपेने ऑपरेशन सुसह्य

|| ॐ श्री साई अनंत||

प. पू. बाबांच्या पहिल्या स्मरणिकेत अनुभव लिहिण्याचा सुंदर राजयोग मला मिळाला आहे. हा अनुभव माझ्या सारखे अडचणीत असणाऱ्यांना मानसिक आधार मिळावा आणि प. पू. बाबांप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून लिहितेय. 

सौ. किर्ती ताईंकडच्या प. पू. बाबांच्या पहिल्या उत्सवापासून मी आणि माझा मुलगा चि. प्रभास येत आहोत. त्या वेळेस माझी मानसिक, शारीरिक अवस्था वाईट होती. मन सैरभैर होते. समोरच्याच्या दृष्टीने मी मजेत होते, हसत होते, बोलत होते. एकूण आनंदी जीवन जगत होते. परंतु माझे मन मात्र थाऱ्यावर नव्हतेच. शरीरात होणारी आग कोणत्याची उपायांनी थांबत नव्हती. ना घरगुती उपायांनी, ना डॉक्टरी उपायांनी. 

डॉक्टरांचे औषध घेऊन घरी यावे मनाला वाटे, “चला आता ह्या औषधांनी आपण बरे होऊ,” तोच त्रास दसपट वाढे. प. पू. बाबांनी पहिल्या उत्सवाला डॉक्टरी उपायांची गरज नाही असे मला सांगितले होते. पण मी ऐकले नव्हते. 

Continue reading “बाबांच्या कृपेने ऑपरेशन सुसह्य”

UK मध्ये बाबांच्या अस्तित्वाची जाणिव

|| श्री ||

“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”. स्वामींशी माझा संबन्ध हा माझ्या लग्नानंतर आला. माझं सासर हे स्वामींचे भक्त आहेत.

आम्ही म्हणजे मी, माझा नवरा राहुल आणि माझा मुलगा क्रिश असे आम्ही तिघे मार्च २०१७ मध्ये क्रिशच्या शाळेला १८ दिवसांच्या सुट्टीसाठी भारतात यायला निघालो. त्यावेळेस तिकीट खूप महाग होते. पण खूप प्रयत्न करून आम्हाला स्वस्तातले तिकीट मिळाले. त्यावेळी राहुलने मला आपल्याला पुण्याला १३ तारखेला किर्तीकडे जायचं आहे असे सांगितले. मी, का? असे विचारले असता, त्याने किर्तीकडे बाबांचा उत्सव आहे, असे सांगितले. मला त्यावेळेला बाबांबद्दल एवढं काहीच माहिती नव्हतं. मला अंधुकसं आठवतंय कि एकदा डोंबिवलीला जाताना आईनी (माझ्या सासू) आणि जयू आत्यांनी (माझ्या आत्ये सासू) मला या बाबांबद्दल सांगितलं होता. बस्स एवढीच मला बाबांबद्दलची माहिती होती.

Continue reading “UK मध्ये बाबांच्या अस्तित्वाची जाणिव”

बाबा आले UK ला

|| श्री बाबा ||

मी राहुल चिटणीस, माझा जन्म मुंबईचा परंतु वास्तव्य ठाण्यात होते. कॉलेजचे डिग्री पर्यंतचे शिक्षण माझे ठाण्यातच झाले. किर्ती हि माझी आतेबहीण. तिची आई लता आत्या हि माझ्या वडिलांची सख्खी बहीण. लता आत्या अकाली गेली आणि किर्तीची मोठी बहीण, किर्ती आणि लहान भाऊ निलेश हे आमच्याकडेच राहू लागले होते. साहजिकच आमचे नाते आते – मामे भावंडांचे न राहता सख्ख्या भाऊ बहिणींचे झाले होते. लहानपणापासूनच किर्ती हि माझी लाडकी बहीण होती. पुढे कालांतराने लग्नानंतर तिची नुपूर म्हणजे माझी भाची, माझ्या आणि किर्तीच्या भावबंधनाना मागे सारत माझी फारच लाडकी झाली. ती आमच्याकडे राहण्यास येत असे. किर्तीचा नवरा म्हणजे माझा मेव्हणा मंगेश, मंगेश हा स्वभावाने मोकळा, ढाकळा, गप्पिष्ट अगदी माझ्या स्वभावाशी त्याचा स्वभाव जुळणारा. `सारख्या पिसांचे पक्षी` हे एकत्रच वावरतात, अशा अर्थाचा एक इंग्रजी वाकप्रचार आहे, त्यानुसार आमचा एकत्र वेळ अतिशय खेळीमेळीत आनंदात जात असे. पहावयास गेलो तर आमच्या दोघांच्या वयात दहा ते बारा वर्षांचा फरक, तरीसुद्धा मंगेशच्या मोकळ्या वागण्याने आम्ही समवयस्कर असण्याचेच भासत असे.

किर्ती जेव्हा पुण्यात स्थायिक झाली तेव्हा मी अनेकदा तिच्याकडे येत असे तेव्हा दंगा, मस्ती, टिंगल, मांसाहारी – शाकाहारी विनोदांचा शिडकाव म्हटल्यावर आनंदाला काय तोटा? `आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे` अशीच एकूण परिस्थिती!! 

Continue reading “बाबा आले UK ला”

बाबा घेतात छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी

|| ॐ श्री साई अनंत ||

आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला मला देवबाबांबद्दल लिहिण्याची संधी मिळतेय त्यासारखे मोठे भाग्य ते काय!! बाबांना वंदन करून त्यांच्याविषयी दोन शब्द लिहिण्याचा मी प्रयत्न करतेय आणि मला आलेले काही अनुभव येथे share करतेय.

सुरुवात कुठून करावी कळत नाहीये, इतकं काही सांगायचं आहे बाबांविषयी. खरंच बाबांमुळे मला एक नवीन जीवन, नवीन आयुष्यच मिळालं आहे. थोडक्यात माझी ओळख करून देते जेणेकरून बाबांनी मला कशी-कशी प्रचिती दिली हे मला सांगता येईल.

मी रमा आमटे, मी एक सायकॉलॉजिस्ट असून २०११ साली माझं M. A. पूर्ण झालं. २ वर्ष मी छोट्या-छोट्या ठिकाणी नोकरी केली. लहानपणापासूनच घरातल्यांचा मी स्वतःच्या पायावर उभं रहावा असा अट्टाहास होता. पण त्यासाठी लागणार पाठिंबा असा नव्हता. मी २ वर्ष छोट्या छोट्या ठिकाणी नोकऱ्या केल्यांनतर माझ्या मैत्रिणीच्या ओळखीने मी तिच्याच येथे अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेत नोकरीस लागले. मी खूप खुश होते, कारण ती एक नावाजलेली संस्था होती. पण मला माहिती नव्हतं कि मी तिथे जाऊन खूप मोठ्या संकटात अडकणार आहे. तिथे काम करत असताना माझी एका मुलीसोबत ओळख झाली, नंतर दिवसेंदिवस ती मैत्री खूप गाढ होत गेली. आम्ही आता दिवसभर एकत्र असायचो. ती मला चांगला पाठिंबा द्यायची. ती आता मला माझ्या बहिणीसारखी होती पण आपल्याला कळत नाही समोरच्याच्या मनात काय असेल? मी नको तेवढी तिच्यात गुंतत होते कारण मला जो पाठिंबा घरात मिळत नव्हता तो तिच्याकडून मिळत होता. मी नेहमी तिच्याच चांगल्याच विचार करत असे. मी माझ्याआधी तिचा विचार करायचे. आम्ही एकमेकींच्या घरी अशा रहात असून कि दोन्ही घरं आमचीच आहेत. तिच्या आई-बाबांनी पण मला मुलगीच मानलं होतं.

Continue reading “बाबा घेतात छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी”

Baba brought light into tunnel of life

|| Jai Baba ||

Didi mentioned that this year being the centenary birth celebration of Baba, we all must put our thoughts about Baba in words and share our experiences with Baba`s family. However, I could not bring myself to pen down anything as I could not think of miracles or any such prominent occurrences that I might have experienced.

My journey with baba began on a belief that there is a power superior who knows what’s good for me and I must follow its advice. However, the important bit `Faith` was missing. I completed whatever was told to me delightedly, be it a pooja or sadhana. Hoping for a miracle to work out and change my life. Who knew that Baba performs miracles in the most unknown and amazing ways and starts with life changing patterns from within ourselves.

Continue reading “Baba brought light into tunnel of life”

बाबांच्या अस्तित्वाची जाणीव

|| ॐ श्री साई अनंत ||

बाबांबद्दल काही अनुभव कथन लिहिण्याच्या निमित्ताने मी माझा खूप महत्वाचा अनुभव तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तरीही यात काही चूकभूल झाली तर यातील माणिकमोती बाबांचा प्रसाद समजावा आणि फोलफट माझी समजावी. जीवनात सर्वात प्रभावी परिणामकारक अनुभव आपण आपल्या बिकट काळात अनुभवतो. बाबांचा आणि माझा तसा काही फार जुना परिचय नाही, साधारण २०१६ हे वर्ष माझ्या जीवनात बाबांच्या आगमनाचे वर्ष.  जीवशास्त्र विषयात पदविका पूर्ण करताना माझी मानवी मन आणि वर्तणूक यामध्ये असलेली आवड अगदी पराकोटीला येऊन ठेपली. वर्गात ऐकू येणारे विज्ञान संशोधन मला जितके प्रभावित करत होते तितकेच अध्यात्मही. अध्यात्मिक प्रगती व्हावी याची सतत ओढ लागून राहिली होती. दिवस मागून दिवस जात असताना बाबा माझ्या जीवनात आले आणि स्थिरावले. काय घडले हे मी खूप विस्तारित करून नाही सांगू शकत पण एवढंच सांगू इच्छितो कि जेव्हा वाटत होते कि सर्व काही हातातून निसटून जातेय तेव्हा फक्त बाबांमुळेच आयुष्य सावरलं. आयुष्याला पुन्हा अर्थ आला. 

Continue reading “बाबांच्या अस्तित्वाची जाणीव”

बाबांनी आधीच केले सतर्क

|| श्री ||

माझे अनुभव म्हणजे देवबाबांचे आपल्याकडे कसं लक्ष असतं आणि योग्यवेळी ते आपल्याला हि बाब कशी दाखवून देतात याची उदाहरणं

प्रसंग पहिला: बाळासंबंधी संकेत 

मी आणि माझी पत्नी देवबाबांचा जप आणि ध्यान करत बसलो होतो. ध्यान करताना माझ्या मनात अचानक बाळाची प्रतिमा डोकावली. वाटलं आपण एका तान्हुल्या बाळाला दोन्ही हातात धरलं आहे. एखाददोन मिनिटं हि भावना राहिली असेल. मग माझं ध्यान उरकलं

माझ्या पाठोपाठ पत्नीचही ध्यान आटोपलं, आणि ती एकदम उत्साहात म्हणाली, ” अरे प्रभास, मला लहान बाळासारखं दिसलं रे ध्यान करताना! मी उडालोच! “अरे मलाही तसंच दिसलं!”

Continue reading “बाबांनी आधीच केले सतर्क”