बाबा माझ्या आयुष्यातले अविभाज्य भाग

|| श्री ||

अंदाजे ३ वर्षाआधी बाबांची साथ मिळाली आणि त्या नंतर पुन्हा कधीही एकटी आहे असं वाटलंच नाही…..

मला जेव्हा पहिल्यांदा बाबांनी त्यांच्या समोर बसून मनातलं सांगायला सांगितलं, शब्द कमी आणि रडू जास्त अशी परिस्थिती होती कारण त्या क्षणी कोणी आपल्याबद्दल इतक्या प्रेमाने विचार करतंय हेच माझ्यासाठी खूप होत. 

माझं लग्न २०१४ मध्ये झालं, तरीही मला काही USA ला जाण्याचा योग येत नव्हता, त्याने आमच्या वैवाहिक जिवनात खूप दुरावा आणि तणाव येऊ लागला होता. परिस्थिती खूप गुंतत घटस्पोटापर्यंत पोहोचली होती, त्या तणावामुळे मला खूप नैराश्य येऊ लागलं होत. आणि तेव्हाच बाबांनी हात धरून मला त्या परिस्थितीमधून बाहेर काढलं. पहिले तर आमची कुलस्वामिनी कोण ते बाबांमुळे कळलं. गेले ३० वर्ष आपली कुलस्वामिनी कोण हे माहित नसताना आज बाबांमुळे तिची पूजा आमच्या घरी होतेय. बाबांनी माझ्या कडून माझ्या कुलस्वामिनीची इतकी सेवा भक्ती करून घेतली आहे कि आज बाबांसोबत तिचीहि खूप कृपा आहे माझ्यावर. हे सगळं बाबांमुळे शक्य झालं आहे. 

बाबांकडे मी स्वतःला पहिल्यांदा व्यक्त केल्यानंतर अगदी १५-२० दिवसातच मला USA मधून युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेशाचे पत्र आले. आणि पहिली पायरी पार झाली. पण बाबांनी हे पण सांगितलं होत कि तिकडे तिची कठीण परीक्षा आहे, पण मला बाबांवर पूर्ण विश्वास होता, “ज्या बाबांनी आपलं इतक्या दिवसांचं रखडलेलं काम इतक्या सहज करून दिलं ते मला तिकडेही नक्की संपूर्ण मदत करतीलच.”

अमेरिकेत आले तरीही बरेच दिवस घटस्फोटाचा विषय निघायचा. अगदी रात्रीला पण डोळा लागत नव्हता… एक एक क्षण काढणं हि कठीण झालं होत. जशी जशी एक एक समस्या उभी राहत होती तसे तसे बाबा माझ्या मागे उभे राहून मला लढण्याचे बळ देत होते त्या संकटाना सामोरं जायला. अगदी लहानात लहान प्रश्न हि बाबांनी न कळत सोडवले. खूप लहान लहान गोष्टीत पण बाबांचे अनुभव आहेत.

जिकडे माझ्या नवऱ्याला विश्वास होता कि माझा काही अमेरिकेत फार काळ टिकाव लागणार नाही तिकडे मला हा आत्मविश्वास होता कि माझ्या बरोबर बाबा आहेत आणि ते पुरेसे आहे.

मी युनिव्हर्सिटी मध्ये आले तसाच मला पार्ट-टाइम जॉब मिळाला त्यातून पुढे मला शिष्यवृत्तीही मिळाली. माझं शिक्षण मी यशस्वीरीत्या पूर्ण केलं आणि अगदी सहज मला फुल-टाइम जॉब पण मिळाला, हे पाहून मीच आश्चर्यचकित झाले. त्यात हि गम्मत अशी कि जो नवरा घटस्फोट घ्यायच्या मागे लागला होता त्याच्याच कंपनीत त्याच्या referral ने मला नोकरी मिळाली आणि त्यात काहीच शंका नव्हती कि सगळं बाबांनीच घडवलं आहे!

माझ्या नोकरीत पण मला खूप छान visibility आहे, इतकी कि अगदी कंपनी च्या CEO ना पण माझ्या कामाचं कौतुक आहे. कारण असं आहे कि कोणतंही काम मी बाबांना प्रार्थना करूनच सुरु करते, मग ते किती का लहान असेना.  कामच नाही तर अगदी रोजच्या स्वयंपाक करतानाही मी बाबांना प्रार्थना करून मग सुरुवात करते, कारण मला वाटत कि बाबांच्या नावाची सकारात्मक ऊर्जा सगळ्या ठिकाणी असली पाहिजे.

मी आज जी काही भक्कमपणे उभी आहे, ते बाबांमुळे आहे आणि मी तितकीच आभारी किर्तीताईंची आणि त्यांच्या कुटुंबीयांची पण आहे.

खूप पूर्वपुण्याई असेल कि बाबांचा मार्ग मिळाला. बाबांमुळे आगाऊच खूप गोष्टी कळतात आणि त्यावर उपाय करता येतात. बाबा आहेत म्हणूनच कधीच एकटं नाही वाटत, आणि एक वेगळंच मानसिक बळ मिळत रहातं.

त्यांनी सांगितलेले सगळे उपाय यशस्वी झालेतच आणि त्यांनी घडवलेला बदल तर शब्दांपलीकडला आहे.

आता घटस्फोटाचा विषय तर निघत नाहीच पण आमच्यातला संबंध हि बराच सुधारलाय.

मी खूप खूप आभारी आहे कि मला ह्या जन्मी बाबांची सोबत मिळाली, म्हणूनच मी खूप मोठ्या गंडांतरातून बाहेर येऊ शकले.

-सौ. शीतल कुंजीर, युटा, यु.एस.ए.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *