|| ॐ श्री साई अनंत ||
आज (२०१८) बाबांचा आपल्याकडचा आठवा उत्सव आणि योगायोगाने त्यांच्या शताब्दी वर्षानिमित्त भक्तांच्या अनुभवांची स्मरणिका छापायचे देखील ठरले. मी आजवर एकदाही अनुभव कथन केलेले नाही. मुळात माला आजवर समजलं नाही नेमकं काय सांगू. ह्यावर्षी बाबांनी माझी परीक्षाच घेतली, ज्यात मी स्वतःच्या बळावर नापास होत असताना बाबांनी त्यांच्या प्रेमाने मला नुसतं सांभाळून नाही घेतलं, तर मला वाचवलं.
गुरू आपण कितीही चुकलो तरी आपल्याला सांभाळून घेतो ह्याचाच प्रत्यय मला आला.
सांगायचं म्हणजे एकाच घरात ७ वर्ष बाबांच्या घरात बाबांसोबत वास्तव्य केल्यामुळे देवबाबा routine झाले आहेत त्यामुळे वेगळं असं काही सांगताच आलं नाही कधी. आई बाबा जे आपल्यासाठी करतात त्यांचे त्या बद्दल आपण फारच कमी वेळा आभार मानतो कारण, आपण त्यांना खूप ग्राह्य धरत असतो. मी तसेच देवबाबांना ग्राह्य धरलेलं. यात काही शंका नाही कि मी कृतज्ञ होतेच, पण ती कृतज्ञता तुमच्या समोर ह्या आठ वर्षात मला कधीच मांडता आली नाही.
कोणत्याही परिस्थितीत गुरूंना आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाला कधीच सोडू नका इतकंच मला माझ्या अनुभवातून सांगायचंय.
Continue reading “गुरूंनी दिलेला मार्ग कधीच सोडू नका”