गुरूंनी दिलेला मार्ग कधीच सोडू नका

|| ॐ श्री साई अनंत ||

आज (२०१८) बाबांचा आपल्याकडचा आठवा उत्सव आणि योगायोगाने त्यांच्या शताब्दी वर्षानिमित्त भक्तांच्या अनुभवांची स्मरणिका छापायचे देखील ठरले. मी आजवर एकदाही अनुभव कथन केलेले नाही. मुळात माला आजवर समजलं नाही नेमकं काय सांगू. ह्यावर्षी बाबांनी माझी परीक्षाच घेतली, ज्यात मी स्वतःच्या बळावर नापास होत असताना बाबांनी त्यांच्या प्रेमाने मला नुसतं सांभाळून नाही घेतलं, तर मला वाचवलं. 

गुरू आपण कितीही चुकलो तरी आपल्याला सांभाळून घेतो ह्याचाच प्रत्यय मला आला. 

       सांगायचं म्हणजे एकाच घरात ७ वर्ष बाबांच्या घरात बाबांसोबत वास्तव्य केल्यामुळे देवबाबा routine झाले आहेत त्यामुळे वेगळं असं काही सांगताच आलं नाही कधी. आई बाबा जे आपल्यासाठी करतात त्यांचे त्या बद्दल आपण फारच कमी वेळा आभार मानतो कारण, आपण त्यांना खूप ग्राह्य धरत असतो. मी तसेच देवबाबांना ग्राह्य धरलेलं. यात काही शंका नाही कि मी कृतज्ञ होतेच, पण ती कृतज्ञता तुमच्या समोर ह्या आठ वर्षात मला कधीच मांडता आली नाही.

कोणत्याही परिस्थितीत गुरूंना आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाला कधीच सोडू नका इतकंच मला माझ्या अनुभवातून सांगायचंय.

       मागील एक वर्षापासून माझं आणि सुमुखचं एक अत्यंत महत्वाचं काम रखडलंय, ते ही असं की ज्यावर पुढची दहा कामं अवलंबून आहेत. सर्वतोपरी प्रयत्न करून सुद्धा ते पूर्णत्वाला जात नाही ह्याची खंत इतकी वाढली होती की हळूहळू frustration आणि त्यातून चीड निर्माण झाली. त्याहीपेक्षा जास्त मला नैराश्य येत होत. त्यामुळे माझी खूप चिडचिड होई. त्यातूनच मी बाबांना चक्क dates आणि targets द्यायला लागले. ह्या ह्या तारखेपर्यंत हे झालं नाही तर, मी हात जोडणार नाही, तुमच्या समोर बसणार नाही, हे आणि असे आणखी बरंच काही बोलायला लागले.

ज्याला मी आणि आई भक्तीची पहिली पायरी म्हणतो त्या ठिकाणी मी स्वतः कधी पोहोचले? माझं मलाच कळलं नाही!!

सुमुखशी, आई-वडिलांशी बोललं तरी मनाला शांत नाही वाटायचं. कारण एकाचं कामावर सगळं लक्ष अडकून पकडल्यामुळे आयुष्य खूप कठीण होत चाललं होतं. आपल्याला आस असलेली गोष्ट मिळत नाही किंवा सहज होणारी कामे घडत नाही तेव्हा कसं वाटतं? तेच सगळं होत होतं. तेच तेच प्रश्न मी घोकत बसायचे. कालांतराने हेच विचार मी सुमुखकडे pass-on करत होते, आता तो सुद्धा म्हणायला लागला बाबांचं आपल्याकडे लक्ष नाही, त्यांची कृपा मिळत नाही. ह्या आधी बऱ्याचदा मनासारखं न घडवता जे जे बाबांनी त्यांच्या मर्जीने घडवलेलं आहे आमचा बाबतीत ते अभूतपूर्व असूनसुदधा आता हा असा उन्मत्तपणा कुठून आणि कधी आला हे आम्हालाही कळलं नाही. कदाचित भक्तीच्या मूलभूत तत्वांचाच आम्हाला विसर पडत चालला होता. ह्या आधी कामं करताना बाबांना म्हणायचो कि, “बाबा जे योग्य ते द्या, सदैव साथ द्या”. पण आता मात्र रडायचो. “Please, Please” म्हणत पण आपल्याला हवं तेच मागायचो. बाबांचा Right to decide whats right for us मी किंबहुना आम्ही नकळत केव्हा काढून घेतला आमचं आम्हालाच कळलं नाही. 

          २६/०९/२०१७ सकाळी माझ्या best friend चा मेसेज आला मला विचारलं, “कशी आहेस गं, तुझं काम पुढे सारकलं का?” अर्थातच भावनिक होऊन I just poured my heart out to her.  माझ्या ह्या मैत्रिणीला ‘देवबाबा’ आपला ‘prayer ग्रुप’ आणि माझ्या आयुष्याबद्दल सगळं माहीत आहे. ह्या मुलीने सुद्धा लहान वयात आईला गमावलं आणि स्वतःचं सगळं काही स्वतःच्या हिम्मतीने मिळवलं. सध्या ती US ला असते आणि Canada immigration साठी तिचे जोरात प्रयत्नं चालू आहेत. ती सुद्धा कष्टाळू आणि हार न मानणारी, देवावर विश्वास असला तरी, देवावरच विसम्बुन न रहाणारी, अशी आहे. ती खूप mature असल्यामुळे मी माझी आई सोडल्यास फक्त तिच्याशी सगळं discuss करते. तिने माझं रडगाणं ऐकलं, मग मला जे काही ती बोलली ते बोलण्याची तीची intellectual level असली, तरी मला राहून राहून बाबाच त्या दिवशी तिच्या मुखातून बोलले असंच वाटतं. 

        सगळं ऐकून घेऊन गायत्री तेच बोलली जे ह्या अगोदर आईने अनेकदा मला समजावलं होतं. पण स्वतःचं दुःखच इतकं मोठं वाटत होतं की ह्यावेळी आईच्या बोलण्याचा पण काही प्रभाव होत नव्हता, पण गायत्रीच्या बोलण्याचा मात्र झाला.

        ती म्हणाली, “दोन दगडांवर पाय ठेवतेस तू, एकीकडे चमत्कारांची अपेक्षा करतेस आणि दुसरीकडे तुला तुझा तुझ्या आयुष्याचा control पण हवाय. एकतर पूर्ण control देवाला दे किंवा तूच पूर्ण control घे. म्हणजे देवाचं कर, पण कृपा तुला हवी तशीच आणि हवी तेव्हा होईल ही अपेक्षा ठेऊ नकोस आणि मिळालीच तर बोनस समज. भक्तीसाठी भक्ती कर आणि कामं पुढे जाण्यासाठी प्रयत्न चालू ठेव. पण कृपा केव्हा -कधी – कशी होईल हे तू ठरवू नकोस. ते देवावर सोड. १० किलो ची अपेक्षा ठेवली आहेस पण त्याला तुला २० किलो द्यायचं असेल तर? Thankful रहा आणि thanks giving साठी भक्ती कर. अपेक्षा ठेऊ नकोस, देव आहे तो शेवटी. अपेक्षा ठेवलीस तर कळतं त्याला, एखाद्या माणसाकडून अपेक्षा केली आणि ती त्याला कळली तर तो सुद्धा कमी देतो मग हा तर देव आहे अपेक्षेपेक्षा जास्त देणारा, पण निरपेक्ष भक्ती केलीस तर!”

       `टिंग टॉंग!` डोक्यात घंटा वाजली अरे हेच अनेकांना आपण दहा वर्ष सांगतोय. जे म्हणायचे आम्ही हे केलं, ते केलं, अमुक केलं तमुक केलं तरी बाबा नाही मदत करत तेव्हा रागात लोकांना बोलायचो, “बाबा तुमच्या बापाचे नोकर नाहीत! त्यांची मर्जी असेल तरच ते काम करतील” अरे पण मग हेच मी का विसरले? कशी विसरले? 

त्याचा पण आरोप शेवटी त्यांच्यावरच! तुम्हीच परीक्षा घेतलीत. ज्यात मी सपशेल नापास होत होते, पण तुमची माया माझ्या भक्तीपेक्षा इतकी श्रेष्ठ आहे की मला तुम्ही नापास होत असताना phone of friend ही lifeline दिलीत आणि परत game on म्हणालात. 

        २६ सप्टेंबरला मी हे लिहून काढले. माझं कामं अजून पूर्ण नाही झालय, पण आता माझा attitude normal झालाय. Attitude of gratitude is very important.

मी गायत्रीशी बोलून झाल्या झाल्या हे लिहिलं. एप्रिल मध्ये हा अनुभव सांगताना परिस्थिती काय असेल? मला माहिती नाही, पण आता माझे काम होते की नाही ह्यापेक्षा मी आता खूप रिलॅक्स झाले कारण आता मी पूर्ण control त्यांना दिलाय अगदी पहिल्यासारखा. मी निस्सीम प्रेम आणि भक्तीच करणार आहे. आता ह्याचा जास्त आनंद वाटतोय की आम्ही दोघं बुडता बुडता वाचलो. 

         बाबा भक्तीच्या पायऱ्यांवर वर नेताना परीक्षा घेतात! ऐकलंय. बघितलंय. काहींना नापास होताना पण पाहिलंय. पण आज स्वतः अनुभवलंय. बाबा परीक्षा नुसत्या घेत नाहीत तर surprise test पण घेतात, जो यात तरला त्याच्यावर खरंच बाबांची कृपा म्हणावी.

         त्यामुळे प्रसंग कोणताही असो मात करायला कष्ट करा. जे जे Practically possible आहे ते ते करा, बाबा साथ देतात. पण चमत्कार त्यांना हवा तेव्हा आणि हवा तेवढाच आणि हवा तसाच. फक्त आपल्या शंका आणि अपेक्षा भक्तीच्या आड मात्र येऊ देऊ नका.

स्वामींच्या तारक मंत्रात म्हंटलेच आहे,

“कितीदा दिला बोल त्यांनीच हात? नको डगमगू, स्वामी देतील साथ

या नंतर असेच काही महिने गेले, आम्ही आमचे राहते घर शहरापासून लांब असल्याकारणाने, आम्ही हक्काचे घर सोडून भाडयाचा घरात राहायला आलो आमच्या convenience साठी. इथे आल्यावर चंपाषष्ठीच्या दिवशी प. पु. देवबाबांनी चम्पाषष्टीचा मुहूर्तावर मला एक प्रसादरूपी आशीर्वाद दिला. 

    देवपूजा करत असताना देवबाबांच्या मुर्तीला आंघोळ घालून त्यांना towel गुंडाळला आणि बाकीच्या देवांना आंघोळ घातली. इतर देवांची आंघोळ झाल्यानंतर जेव्हा मी बाबांची मुर्ती पुसायला गेले तेव्हा पाहिलं कि बाबांच्या पायाखालून चक्क भंडारा बाहेर आला होता. आधी माझा विश्वासच बसला नाही. पण विश्वास ठेवण्यापलीकडे खरोखरच पर्याय नव्हता. मी ताबड़तोब फ़ोटो काढून आईला पाठवला, तिने बाबांच्या तोंडी दूध-साखर लावायला सांगितलं. थोडक्यात सांगायचे झाले तर ज्याक्षणी चमत्कार घडण्याची अपेक्षा सोडली तेव्हाच बाबांनी ते काहीही करू शकतात हेच दाखवून दिले. 

बाबांची कृपा आपल्या सगळ्यांवर अशीच राहु देत हीच सदिच्छा.

– सौ. नुपूर सुमुख दिवटे, रावेत, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *