Baba brought light into tunnel of life

|| Jai Baba ||

Didi mentioned that this year being the centenary birth celebration of Baba, we all must put our thoughts about Baba in words and share our experiences with Baba`s family. However, I could not bring myself to pen down anything as I could not think of miracles or any such prominent occurrences that I might have experienced.

My journey with baba began on a belief that there is a power superior who knows what’s good for me and I must follow its advice. However, the important bit `Faith` was missing. I completed whatever was told to me delightedly, be it a pooja or sadhana. Hoping for a miracle to work out and change my life. Who knew that Baba performs miracles in the most unknown and amazing ways and starts with life changing patterns from within ourselves.

Continue reading “Baba brought light into tunnel of life”

बाबांच्या अस्तित्वाची जाणीव

|| ॐ श्री साई अनंत ||

बाबांबद्दल काही अनुभव कथन लिहिण्याच्या निमित्ताने मी माझा खूप महत्वाचा अनुभव तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तरीही यात काही चूकभूल झाली तर यातील माणिकमोती बाबांचा प्रसाद समजावा आणि फोलफट माझी समजावी. जीवनात सर्वात प्रभावी परिणामकारक अनुभव आपण आपल्या बिकट काळात अनुभवतो. बाबांचा आणि माझा तसा काही फार जुना परिचय नाही, साधारण २०१६ हे वर्ष माझ्या जीवनात बाबांच्या आगमनाचे वर्ष.  जीवशास्त्र विषयात पदविका पूर्ण करताना माझी मानवी मन आणि वर्तणूक यामध्ये असलेली आवड अगदी पराकोटीला येऊन ठेपली. वर्गात ऐकू येणारे विज्ञान संशोधन मला जितके प्रभावित करत होते तितकेच अध्यात्मही. अध्यात्मिक प्रगती व्हावी याची सतत ओढ लागून राहिली होती. दिवस मागून दिवस जात असताना बाबा माझ्या जीवनात आले आणि स्थिरावले. काय घडले हे मी खूप विस्तारित करून नाही सांगू शकत पण एवढंच सांगू इच्छितो कि जेव्हा वाटत होते कि सर्व काही हातातून निसटून जातेय तेव्हा फक्त बाबांमुळेच आयुष्य सावरलं. आयुष्याला पुन्हा अर्थ आला. 

Continue reading “बाबांच्या अस्तित्वाची जाणीव”

बाबांनी आधीच केले सतर्क

|| श्री ||

माझे अनुभव म्हणजे देवबाबांचे आपल्याकडे कसं लक्ष असतं आणि योग्यवेळी ते आपल्याला हि बाब कशी दाखवून देतात याची उदाहरणं

प्रसंग पहिला: बाळासंबंधी संकेत 

मी आणि माझी पत्नी देवबाबांचा जप आणि ध्यान करत बसलो होतो. ध्यान करताना माझ्या मनात अचानक बाळाची प्रतिमा डोकावली. वाटलं आपण एका तान्हुल्या बाळाला दोन्ही हातात धरलं आहे. एखाददोन मिनिटं हि भावना राहिली असेल. मग माझं ध्यान उरकलं

माझ्या पाठोपाठ पत्नीचही ध्यान आटोपलं, आणि ती एकदम उत्साहात म्हणाली, ” अरे प्रभास, मला लहान बाळासारखं दिसलं रे ध्यान करताना! मी उडालोच! “अरे मलाही तसंच दिसलं!”

Continue reading “बाबांनी आधीच केले सतर्क”

गुरूंनी दिलेला मार्ग कधीच सोडू नका

|| ॐ श्री साई अनंत ||

आज (२०१८) बाबांचा आपल्याकडचा आठवा उत्सव आणि योगायोगाने त्यांच्या शताब्दी वर्षानिमित्त भक्तांच्या अनुभवांची स्मरणिका छापायचे देखील ठरले. मी आजवर एकदाही अनुभव कथन केलेले नाही. मुळात माला आजवर समजलं नाही नेमकं काय सांगू. ह्यावर्षी बाबांनी माझी परीक्षाच घेतली, ज्यात मी स्वतःच्या बळावर नापास होत असताना बाबांनी त्यांच्या प्रेमाने मला नुसतं सांभाळून नाही घेतलं, तर मला वाचवलं. 

गुरू आपण कितीही चुकलो तरी आपल्याला सांभाळून घेतो ह्याचाच प्रत्यय मला आला. 

       सांगायचं म्हणजे एकाच घरात ७ वर्ष बाबांच्या घरात बाबांसोबत वास्तव्य केल्यामुळे देवबाबा routine झाले आहेत त्यामुळे वेगळं असं काही सांगताच आलं नाही कधी. आई बाबा जे आपल्यासाठी करतात त्यांचे त्या बद्दल आपण फारच कमी वेळा आभार मानतो कारण, आपण त्यांना खूप ग्राह्य धरत असतो. मी तसेच देवबाबांना ग्राह्य धरलेलं. यात काही शंका नाही कि मी कृतज्ञ होतेच, पण ती कृतज्ञता तुमच्या समोर ह्या आठ वर्षात मला कधीच मांडता आली नाही.

कोणत्याही परिस्थितीत गुरूंना आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाला कधीच सोडू नका इतकंच मला माझ्या अनुभवातून सांगायचंय.

Continue reading “गुरूंनी दिलेला मार्ग कधीच सोडू नका”

बाबांमुळे घडली वारी

|| ॐ श्री साई अनंत ||

प. पु. देवबाबांचे प्रथम दर्शन, अर्थात फोटोतुनच साधारण २५-२६ वर्षांपूर्वी घडले. माझ्या आतेबहीणीच्या घरी ठाणे येथे गेलो होतो. त्यांच्या घरी देवखोलीत प. पु. बाबांचा मोठा फोटो लावलेला होता. उत्सुकतेने विचारणा केल्यावर प. पु. बाबांबद्दल माहिती कळली. आतेबहीणीचे यजमान श्री. चंद्रकांत देशपांडे बाबांचे निस्सीम भक्त. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना प. पु. बाबांचा निकट सहवास लाभला होता. त्यावेळी मला अध्यात्मिक विषयात जास्त गोडी नव्हती. भौतिक विषयांमध्ये गुंतून पडायचा स्वभाव होता. त्यामुळे प. पु. बाबांची मिळालेली माहिती काळानुरुप पुसट होत गेली. वास्तविक माझ्या अंदाजाने त्यावेळी प. पु. बाबांचे अवतारकार्य सुरु होते. पण माझ्या नशिबात बाबांचे प्रत्यक्ष दर्शन नव्हते. 

त्यानंतर सन २०१०-११ च्या दरम्यान माझी पत्नी सौ. संगीता, सौ किर्तीताईंकडे केसांच्या ट्रीटमेंट करिता जात होती. तिच्याकडून सौ. किर्तीताईंकडे असलेल्या प. पु. बाबांच्या स्थानाबद्दल आणि प. पु. बाबांबद्दल कळायला लागले. एक/दोन वेळा गुरुवारच्या आरतीसाठी स्थानावर आलो. १३ एप्रिल २०११ चा पुणे स्थानावरील पहिला जन्मोत्सव अनुभवला आणि त्यानंतर प. पु. बाबांकडे मी केव्हा आणि कसा ओढला गेलो हे माझे मलाच समजले नाही.

Continue reading “बाबांमुळे घडली वारी”

बाबांमुळे झाली एडमिशन

|| ॐ श्री साई अनंत ||

माझं नाव दिपाली विठ्ठल भादवणकर.  सुरुवातीपासूनच मी अत्यंत भित्री, थोडी बुजरी, थोडी नकारात्मक आणि अजिबात आत्मविश्वास नसलेली मुलगी होते.  बाबांचं माझ्या आयुष्यात येणं हे माझ्या आयुष्याला कलाटणी देणारच ठरलं. 

  जून २०१४ ची गोष्ट आहे. मी नैराश्याच्या अगदी खोल गर्तेत पोहोचले होते. कारणही तसंच होतं. दोन वर्षापासून एकाच गोष्टीसाठी अविरत प्रयत्न चालू होता माझा. काही केल्या ग्रॅज्युएशनचं शेवटचं वर्ष सूटतच नव्हत. मुळातच मी फार मेहनती आहे. कधीच नापास होण्याची गोष्ट सोडा पण साधं काठावर पास झाल्याचं सुद्धा माहित नव्हतं. रिझल्ट नेहेमीच बऱ्यापैकी असायचा माझा आणि घरची परिस्थिती हि अशी नव्हती कि ते सतत मला एकाच परीक्षेला बसू देतील. कारण काही केल्या कळतच नव्हतं. बऱ्याच जणांना विचारून देखील झालं पण परिणाम शुन्य. 

Continue reading “बाबांमुळे झाली एडमिशन”

बाबांनी मुलाला वाचवले

|| श्री साईनाथाय नमः ||

|| श्री स्वामी समर्थ ||

 खरंतर काय लिहायचं ते सुचत नाही पण “देवबाबांचे अनुभव सांगितल्याशिवाय रहावत नाही, म्हणून हा छोटासा प्रयत्न…

  साधारण २०१३ ची वेळ. माझा मुलगा साहिल (राऊ) बारावी सायन्सला होता आणि त्यावर्षी तो नापास झाला. ती वेळ माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी भयंकर होती. त्यावेळी माझे बाबा (श्री अरुण दोंदे) मला म्हणाले कि किर्तीकडे बाबांचे स्थान आहे तर तू त्याला घेऊन जा दर्शनाला. खरेतर किर्ती माझी मोठी वाहिनी, परंतु तोपर्यंत मला देवबाबांबद्दल जास्त माहिती नव्हती. घरातच बाबांचे स्थान पण मला माहिती नव्हती, किती हे माझे दुर्भाग्य!! पण म्हणतात ना कि वेळ आल्याशिवाय बाबांची भेट होत नाही. त्यावेळी मी आणि माझा मुलगा साहिल खऱ्या अर्थाने देवबाबांच्या दर्शनाला आलो.

बाबांनी त्याला काही गोष्टी करायला सांगितल्या जेणेकरून त्याला पुढील दृष्टीने मदत होईल, परंतु त्या त्याने कटाक्षाने पाळल्या नाहीत आणि तो पुन्हा एकदा बारावी सायन्सला नापास झाला. त्याला त्याच्या निष्काळजीपणे वागण्याचा धडाच मिळाला. मला आता सांगतानाही त्यावेळेची परिस्थिती आठवली तरी अंगावर काटा येतो. कारण एकदा नाही तर दोनदा त्याला त्या परिस्थितीतून जावं लागलं. त्यामुळे घरात होणारे वाद, भांडणं नको वाटायचे.

Continue reading “बाबांनी मुलाला वाचवले”

बाबांसोबतचे विलक्षण नाते

|| ॐ  श्री साई अनंत ||

आज खरंच खूप महिन्यांनी देवबाबांबद्दल लिहिण्याचा योग, त्यांच्याच कृपेने आला. इतके दिवस खरंच लिहायची खूप इच्छा असून देखील योग येत नव्हता. कदाचित भीती होती कि आपण आपले अनुभव असे लिहू शकू का? याची.

देवबाबा म्हणजे आमचे फक्त आणि फक्त `बाबा`. त्यांचं आणि माझं खरंच तसंच आहे. वडील – मुली सारखं आणि हो, हे त्यांनीच मला सांगितलं आहे. बाबा हे प्रत्येक श्वासात असतात. या वाक्यातच खरंच सगळं सामावलं आहे. हे आयुष्य फक्त बाबांच्या कृपा आणि आशीर्वाद यांच्यामुळे खूप उत्तम असं आहे.

बाबांची आणि माझी पहिली भेट अगदी अनपेक्षित होती. जेव्हा मी लग्न करून पुण्याहून कल्याणला आले आणि बाबा इकडून पुण्याला गेले. गौरवकडून (माझा नवरा) बाबांबद्दल मला कळलं होतं. खरंतर तो मला न सांगताच पहिल्या उत्सवासाठी पुण्याला आला होता आणि नंतर कल्याणला आल्यावर मला अगदी थोडक्यात पण महत्वाची (त्याच्या स्वभावाप्रमाणे) माहिती बाबांबद्दल सांगितली. मला त्याक्षणी खरंच खूप कुतूहलता होती कि नक्की कोण असतील हे? कसे असतील? कारण त्या काही दिवसांमध्ये मी आणि गौरव खरंच कोणत्या तरी अनामिक ओढीने गुरूंचा शोध घेत होतो. कारण आपण कितीही प्रयत्न केले तरी गुरूंची कृपा आपल्यावर असल्या शिवाय आपण यशस्वी होऊच शकत नाही, या पक्क्या विचारांचे आम्ही झालो होतो आणि म्हणूनच गौरवने मला जेव्हा त्याची गोष्ट सांगितली कि देवबाबा हेच त्याचे गुरु आहेत आणि त्यांचं नातं हेही जन्मोजन्मीचं आहे, तेव्हा तर मी खूपच अधीर झाले होते त्यांना भेटायला.

Continue reading “बाबांसोबतचे विलक्षण नाते”

माझा बाबांपर्यंत पोहोचण्याचा प्रवास

|| ॐ श्री साई अनंत ||

|| गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः 
गुरु: साक्षात परंब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ||

सगळ्यात पहिले सर्व सद्गुरुतत्वाला वंदन करून आणि त्यांच्या अनुमतीने मी लिखाणाचा प्रयत्न करणार आहे. हे लिखाण नव्हेच तर त्यांनी केलेले हे माझ्यावरचे अकारण कारुण्य आहे. प्रेम आहे. एका आईने त्याच्या लेकरावर केलेली निःसीम माया आहे. हे प्रेम, हि माया शब्दात मांडणे खरोखरच अवघड आहे. कारण आईची उबदार कूस हि फक्त मुलाने अनुभवायची असते. त्यामुळे कशी आणि कुठून सुरुवात करू हे समजत नाहीये. खूप लहानपणापासून बाबा माझ्या सोबत कुठल्या ना कुठल्या रूपात होते. त्यांनी पावलोपावली अलगद हळुवारपणे माझा सांभाळ केला आहे. जेव्हा आयुष्यात मागे वळून पहाते तेव्हा तेव्हा जाणवते कि अरे हा प्रसंग किती कठीण होता! पण तरीही आपण नं डगमगता कसे काय यातून बाहेर आलो? हि ताकद, हि शक्ती कुणी दिली आपल्याला? प्रत्येक वेळी कुणाच्यातरी रूपात बाबा होतेच कि आपल्यासोबत. फक्त तेव्हा कळत नव्हते ते त्यांचे अस्तित्व. वयाच्या दहाव्या वर्षी आई वारली, आणि ती जागा मामीने भरून काढली. तिनेही प्रेमाने वाढविले, अगदी लग्न होईपर्यंत. ती माया देणारे, प्रेम करणारे, माझे बाबा मामीच्या रूपात हजर होते.

Continue reading “माझा बाबांपर्यंत पोहोचण्याचा प्रवास”