|| श्री ||
आज खूप छान योग आलाय, सगळ्यांसोबत अनुभव share करण्याचा. माझं लग्न ठरल्यापासून मी बाबांच्या इथे येत आहे. जेव्हा जेव्हा बाबांच्या स्थानावर येते, तेव्हा तेव्हा एक अशी positive energy मिळाल्यासारखे वाटते. हळू-हळू खूप ओढ निर्माण झाली आणि आता कुठलाही प्रसंग असतो चांगला, वाईट, आधी बाबांचं नाव तोंडात येतं.
बाबा आपल्या बरोबर आहेत हे ते नेहमीच छोट्या छोट्या गोष्टींमधून दाखवून देतात. मी बाबांची उपासना करायला लागल्या पासून मला माझ्या मध्येही खूप फरक जाणवायला लागलेत. माझ्या स्वभावातही काही बदल झालेत, ज्यांच्या मुळे आयुष्यात एक वेगळीच शांतता लाभली आहे.
१२ एप्रिल २०१७ ला स्थानावर दत्त याग होता आणि मला जाण्याची खूप इच्छा होती, पण मुलगी लहान असल्यामुळे मी जाऊ शकले नव्हते. मनाला खूप हुरहूर लागली होती. दुसऱ्या दिवशी उत्सव होता. सगळा दिवस गेला, संध्याकाळी घरी जाण्याच्या वेळी, स्थानावरून निघताना होमाच्या दिवसाचं एक अत्तर लावलेले गुलाबाचे फुल मला त्या होमाचा प्रसाद म्हणून मिळालं. त्या दिवशी खूप भरून आलं आणि बाबांचे आभार कसे मानावेत, कृतज्ञता कशी व्यक्त करावी हे शब्दात मांडताच येईना.
माझी सक्खी धाकटी बहीण ठाण्याला असते आणि मी पुण्याला, मला माझ्या धाकट्या बहिणीची खूप काळजी वाटत होती. मी नेहमी मनातल्या मनात म्हणायचे, “बाबा तिच्या सोबत रहा, तिची काळजी घ्या, तिला माझी कमी जाणवू देऊ नका”. एके दिवशी अचानक बाबांचा निरोप मिळाला, “तिची काळजी करू नकोस, मी आहे तिच्या सोबत”.
माझं लग्न झाल्यावर काही महिन्यांनी मी आणि माझे पती एकदा ध्यानस्त बसलेलो असताना अचानक मला आणि त्यांना एकाच वेळी बाबांनी बाळाचे संकेत दिले. ध्यान संपल्यावर मी त्यांना मला काय दिसले ते सांगितले. ते म्हणाले कि त्यांना पण असच एक बाळ दिसले, हे बाबांनी आम्हाला दाखवून दिलेले कि आता बाळ होण्याची वेळ आली आहे.
यथावकाश आम्हाला मुलगी झाली. आमच्यासाठी ती देवबाबांचा प्रसादच आहे. आता ती ३ वर्षांची आहे आणि तिची शाळेतील प्रगती बघता तिच्यावर देवबाबांची कृपा आहे याची खात्रीच पटते. अशीच त्यांची आम्हा सगळ्यांवर कृपादृष्टी राहो हीच प्रार्थना.
-यशश्री प्रभास गुप्ते, कोथरूड, पुणे