|| ॐ श्री साई अनंत ||
|| गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः
गुरु: साक्षात परंब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ||
सगळ्यात पहिले सर्व सद्गुरुतत्वाला वंदन करून आणि त्यांच्या अनुमतीने मी लिखाणाचा प्रयत्न करणार आहे. हे लिखाण नव्हेच तर त्यांनी केलेले हे माझ्यावरचे अकारण कारुण्य आहे. प्रेम आहे. एका आईने त्याच्या लेकरावर केलेली निःसीम माया आहे. हे प्रेम, हि माया शब्दात मांडणे खरोखरच अवघड आहे. कारण आईची उबदार कूस हि फक्त मुलाने अनुभवायची असते. त्यामुळे कशी आणि कुठून सुरुवात करू हे समजत नाहीये. खूप लहानपणापासून बाबा माझ्या सोबत कुठल्या ना कुठल्या रूपात होते. त्यांनी पावलोपावली अलगद हळुवारपणे माझा सांभाळ केला आहे. जेव्हा आयुष्यात मागे वळून पहाते तेव्हा तेव्हा जाणवते कि अरे हा प्रसंग किती कठीण होता! पण तरीही आपण नं डगमगता कसे काय यातून बाहेर आलो? हि ताकद, हि शक्ती कुणी दिली आपल्याला? प्रत्येक वेळी कुणाच्यातरी रूपात बाबा होतेच कि आपल्यासोबत. फक्त तेव्हा कळत नव्हते ते त्यांचे अस्तित्व. वयाच्या दहाव्या वर्षी आई वारली, आणि ती जागा मामीने भरून काढली. तिनेही प्रेमाने वाढविले, अगदी लग्न होईपर्यंत. ती माया देणारे, प्रेम करणारे, माझे बाबा मामीच्या रूपात हजर होते.
लग्नानन्तर काही कठीण काळ आला, पण न हरता, न घाबरता, खंबीरपणे उभी राहिले. घरात सारखी परमपूज्य जानकी आजीची पारायणे करीत राहिले, कि यातून बाहेर काढ. एक दिवस दुपारी चार महिन्याच्या माझ्या नूपुरला घेऊन झोपले असताना, झोप कुठली जागीच होते. साईबाबा खोलीत आले, माझ्या जवळ बसले आणि म्हणाले, “घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे”. त्यावेळी ना माझ्या माहेरी कुणी साईबाबांचे करत होते ना सासरी. पण मी तेव्हा साईंची आरती व मंत्रे म्हटली. त्यावेळी त्यांनी माझ्या हातावरून त्यांचा हात फिरवला. आणि त्या थंडगार स्पर्शाने मी भानावर आले. खूप घाबरले होते, कारण देव दिसतो हे पहिल्यांदाच अनुभवलं होतं. दुसऱ्याच दिवशी माझे सासरे माझ्या घरी आले आणि म्हणाले, “कीर्ती तुझ्या सासूच्या स्वप्नात साईबाबा आले काल आणि म्हणाले तुझ्या सुनेला मी घरात आणले आणि तू मात्र मला बाहेरच ठेवलेस, तेव्हा तुझ्या घरी मी एक बाबांचा फोटो दिला तर त्यापुढे दिवा लावशील का?” घडलेला प्रकार ऐकून मी अवाक झाले कारण आदल्याच दिवशी मला बाबांनी दर्शन दिले होते आणि अशा प्रकारे `साई` माझ्या घरात आले, माझ्या घरात नव्हे तर मी त्यांच्या जवळ गेले. योगायोग म्हणावा कि बाबांचे नियोजन माहिती नाही पण माझी लग्नाची प्रत्येक गोष्ट गुरुवारी झाली होती. साईंचे मी काहीही करत नव्हते, त्यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हती पण म्हणतात ना कि गुरुचे कारुण्य ते हेच. हळूहळू सगळ्यातून बाहेर पडले.
मधल्या काळात जमले तसे उपवास, पारायणे, देवळे चालूच होती. आणि काही वर्षांनी निकिताचाजन्म झाला, माझ्या छोट्या मुलीचा. निकिताच्या जन्मानंतर हळूहळू अशी काही चक्रे फिरू लागली कि मलाच समजले नाही. वेगवेगळ्या विभूती माझ्या संपर्कात येऊ लागल्या पण सगळे दत्तसंप्रदायी. सद्गुरु हळूहळू आपल्याला कसे त्याच्या जवळ घेतो याचेच हे उदाहरण. मीही अलगद यासगळ्याजवळ जात होते. ह्याच काळात माझी एक मैत्रीण जी अनिरुद्ध जोशी ज्यांना बापू म्हणतात ह्यांचे करत होती. ह्याबद्दल मला काहीच माहिती नव्हते. असेच एक दिवस दुपारी मला सत्यनारायणाची पूजा दिसली. त्या पूजेच्या चौरंगावर फुलांच्या मला सोडल्या होत्या आणि त्यात एक जिवंत गृहस्थ बसलेले दिसले. माझ्याकडे बघून म्हणाले, “ये ना, मी तुझी वाट पहातोय”. मला ह्या स्वप्नाचा अर्थच काळाला नाही. एकतर पूजा मंडळी आहे, त्यात हा मनुष्य काय करतोय? आणि परत मला बोलावतोय. सगळंच अनाकलनीय होतं. योगायोगाने माझी मैत्रीण संध्याकाळी माझ्या घरी आली. तेव्हा तिला मी हे स्वप्न सांगिलते. ती काय ते समजली आणि मला इतकंच म्हणाली, “गुरुवारी माझ्याबरोबर माझ्या गुरूंकडे येशील का?” मी लगेच हो म्हटले. आणि आम्ही दोघी बांद्रयाला त्यांच्या प्रवचनस्थळी पोहोचलो. जागा पकडून बसलो. खूप गर्दी होती, मलाही कुतूहल होतेच. थोड्यावेळाने बापू आले. आणि सगळे बसल्याजागेवरूनच त्यांना नमस्कार करू लागले. मला हे सगळं नवीन होतं. मी मागे वळून पाहिलं आणि थक्क झाले. जी व्यक्ती मला पूजेत बसून बोलवत होती ती हीच होती. माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. माहित नाही या आधी हे असे कधीच झाले नव्हते. अत्यंत प्रेमळ हसरा चेहरा आणि आशीर्वादाचे हात…. एकाच क्षण त्यांची आणि माझी नजरानजर झाली आणि जणू कित्येक वर्षांची जुनी ओळख असल्यासारखे हसले ते. मी फक्त रडत होते, का ते माहिती नाही. मत्रिणीने माझा हात घट्ट धरला आणि म्हणाली तू मला जे वर्णन केला होतस त्यावरूनच मी तुला इथे घेऊन आले. आणि त्याक्षणापासून मी बापूंचं करू लागले. त्यांची उपासना घेतली. खूप छान छान अनुभव घेऊ लागले. त्यांनीच साईबाबांचे चरित्र उलगडून सांगितले. बाबा खूप खूप जवळ येतं गेले.
अशीच २-३ वर्ष गेली. आणि एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आली. सगळं सद् गुरूंचे नियोजन. तीही बाबाभक्तच. हळूहळू आमच्यात आमच्यात बाबांविषयी संवाद, विचारांची देवाणघेवाण सुरु झाली. एक दिवस अचानक मला त्यांनी एक उपाय करायला सांगितलं मीही थोडे गांगरलेच. तेव्हा त्यांनी मला सांगितलं कि माझ्याशी बाबा बोलतात. काही गोष्टी अशा काही त्यांनी मला सांगितल्या कि ज्या फक्त आणि फक्त मलाच माहिती होत्या. त्यामुळे माझा विश्वास त्यांच्यावर ठामपणे बसला. मग पुढे त्यांनी मला काही करायला सांगावं आणि मी ते पूर्णपणे श्रद्धेने करावं असंच होतं गेलं. ह्यात बरेच दिवस गेले. एक दिवस सहजच मी त्यांच्या घरी गेले असताना, एक फोटो पहिला. तेजपुंज फोटो. मी सहजच विचारला हे कोण आहेत? त्यावर ते म्हणाले, “हेच तर तुला काही उपाय करायला सांगतात”. इतके दिवस मी समजत होते बाबा म्हणजे साईबाबा, आणि बापूंचा मार्गही साईबाबांचाच मग हे बाबा कोण? मी अत्यंत अपराधी भावाने घरी परतले. वाटले आपण आपल्या गुरूशी प्रतारणा केली. साईबाबा समजून दुसऱ्याच कुठल्यातरी बाबांचे ऐकले इतके दिवस. संध्याकाळी बापूंच्या उपासनेला बसले. उपासना झाल्यावर त्यांची माफी मागितली कि मी तुमच्याशी प्रतारणा केली. साधना संपवून उठले आणि फोन वाजला. फोन उचलला पलीकडून त्या व्यक्तीचा आवाज, “तुला बाबांचा मेसेज आहे, माझ्यात आणि अनिरुद्ध बापू ह्यांच्यात भेद करू नकोस आम्ही एकच आहोत”. मी आवाक झाले. आताच आपण बापूंची माफी मागितली आणि बाबांनी हा मेसेज द्यावा! आणि त्या क्षणापासून अपराधाची भावना निघून गेली आणि त्यांच्याकडे ओढले गेले ती आजतागायत आणि पुढचे प्रत्येक जन्म!! ते तेजःपुंज बाबा म्हणजे आपल्या सगळ्यांचे परमपूज्य देवबाबा.
पुढे बाबांच्या आज्ञेने व आशीर्वादाने पुण्यात स्थायिक झाले. पण त्याआधी बाबांनी सांगितले होते कि माझं स्थान पुण्यात होणार आहे. तेव्हा कुठे कल्पना होती कि मीच पुण्यात स्थायिक होईन आणि स्थान इथेच होईल याची. सर्व त्यांचेच नियोजन….
हळूहळू पुण्यात स्थिरावले. त्यांच्या आशीर्वादाने निकिताला चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला. नुपूरचा दहावीचा निकाल चांगला लागला आणि तिचंही चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झाली. बाबांनी मला सांगितलं होतं, “तुझ्या मुलींची काळजी मी करिन तू करू नकोस”. त्याप्रमाणेच सगळं घडलं. हळूहळू बाबा म्हणजे घरातील सदस्याप्रमाणे झाले. गुरूपेक्षाही आता ते वडील, आई, मित्र, तर मुलींचे आजोबा बनले. छोट्यात छोटी गोष्ट असली तरीही ती बाबांना सांगावी त्यांची मार्गदर्शन घ्यावं. हळूहळू माझ्याबरोबर माझ्या मुली आणि पतीही त्यांना मानू लागले. कुठलाही निर्णय घेताना ते मला सांगू लागले कि “बाबांना विचार”. एकूणच काय घरातील सर्वजण बाबांचे झाले. घरातही काही सकारात्मक बदल घडले.
घरात बाबांचे अष्टक म्हणणे, बाबांची पोथी वाचणे चालूच होते. बाबांनी दिलेले उपाय वेळोवेळी करणे हे तर नित्याचेच झाले होते. हे आपण का करतोय हा प्रश्न मनात कधी आलाच नाही. फक्त एवढंच माहिती होतं गुरुआज्ञा पाळणे. नुपूर अकरावीत असताना बाबांनी नूपुरच्या आयुष्यात येणारे असेकाही योग सांगितले कि मी थोडी साशंक झाले, “तिच्या आयुष्यात असे दोन योग आहेत कि एक चांगला मुलगा येईल किंवा एक वाईट मुलगा येईल कि ज्यायोगे तीचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल, लक्ष ठेव”!! मी मनातून घाबरून गेले. बाबांना म्हटलं तुम्ही माझ्या मुलींची जबाबदारी घेतली आहे तेव्हा वाईट योग तुम्हीच टाळा. पण मनातून मात्र धास्तावले होते. आणि या घटनेनंतर दोनच महिन्यात नुपूरने मला सांगतले, “आई मला एक मुलगा आवडतो पण बाबांची अनुमती असेल तरच पुढे जाईन मी”. मी ठामपणे तिला माझा नकार सांगितला. कारण मला तिला खूप शिकवायचं होतं. कायम पहिल्या पाचात असणाऱ्या नूपुरच करिअर मला वाया जाऊन द्यायचे नव्हते. बाबांचे शब्द माझ्या कानात घुमू लागले. त्या महान असामीला मी फोन लावला. आणि सर्व सांगितले. त्यांनी एका शब्दात मला निरुत्तर केले. म्हटले, “बाबांनी त्या दोघांना एकत्र आणलेय, तू मध्ये पडू नकोस, तिचे लग्नही बाबाच लावणार २०११ ते १३ दरम्यान लग्न झालेच पाहजे नाहीतर बाबा जबाबदारी घेणार नाहीत”. निश्चिन्त मनाने मी सर्व बाबांवर सोपवले. नंतर प्रत्येक वर्षी नुपूर फिजिओथेरॅपीच्या वर्षांत कॉलेजमध्ये पहिल्या तीनात राहिली आणि तिने उत्तम करिअर केले. कुठेही मला पश्चातापाची वेळ आली नाही. तसेच ती ज्याच्या प्रेमात पडली तो सुमुखही कॉलेजमध्ये उत्तमरीत्या प्रगती करत होता. हळूहळू तोही बाबांचे करू लागला होता. त्यालाही छान अनुभव येऊ लागले होते. त्याच्या आईचे व माझे संबंधही चांगले छान जमले होते, त्याही बाबांची भक्ती करू लागल्या होत्या. एकूणच काय तर बाबांनी दोघांनाच नाही तर दोन कुटुंबाना आपल्या प्रेमात बांधले होते.
निकिताचीही दहावी पार पडली. तिच्या दहावीच्या वेळी बाबांनी बरेच काही तिच्याकडून, माझ्याकडून करून घेतले. प्रत्येक वेळी मी त्यांना एकच प्रार्थना करीत असे कि, “बाबा हिला चांगले कॉलेज मिळूदे”. तिला गणितात अजिबात रस नव्हता आणि त्यामुळे टक्के खाली येऊ शकतात, आणि चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणं कठीण होईल, हि भीती माझ्या मनात सतत येतं असे. यावर बाबांचे एकच उत्तर, “तिची काळजी करू नकोस, ती माझी मुलगी आहे”. झालं रिजल्ट लागला आणि गणित हा विषय पहिल्या सर्वोत्तम पाच विषयात होता!! पुन्हा एक सुखद धक्का… काही दिवसांनी कॉलेज चे फॉर्म भरले जाणार होते, कित्येक दिवस संपर्कात नसलेली निकिताची एक मैत्रीण, तिचा फोन आला, “मॉडर्न कॉलेज मध्ये ऍडमिशन हवी आहे का?” निकिता तर आनंदून गेली होती. पण मी म्हटलं, “डोनेशन किती आणि अजून फॉर्म कुठे भरायला सुरु झालंय”? त्यावर तिने उत्तर दिले डोनेशन एकही रुपया नाही, फक्त अडीच हजार भरा पहिले आणि ऍडमिशन घ्या. मीही घेतेय ऍडमिशन. माझ्या बाबांच्या ओळखीने मिळते आहे. जो माणूस ऍडमिशन देणार आहे तो फक्त आजच आहे, नंतर मग काम होणार नाही. तो फक्त माझं काम करतो आहे पण मी त्याला निकिताचंही नाव सांगितलं आहे. नूपुरच्या हातात मी पैसे दिले आणि दोघींना कॉलेज मध्ये त्या मुलीसोबत पाठवले. ऍडमिशन झाली, रीतसर रिसीट पण आली. लोकांचे तर अजून फॉर्मही झाले नव्हते, कुठल्याही कॉलेजची प्रोसेस सुरु व्हायला अजून ४०-४५ दिवस जाणार होते. पण निकिताचे ऍडमिशन होऊन आम्ही निश्चिन्त झालो होतो. परत बाबांनी दाखवले, “विनाकारण काळजी करू नकोस मी आहे”
पावलोपावली बाबांचे अस्तित्व जाणवू लागले होते. त्यांचा घरातील वावरही हळूहळू जाणवायला लागला होता. आयुष्यात भीती हा शब्दच उरला नव्हता. आहेत ना बाबा, बघतील, हि मानसिकता तयार झाली होती. तो काळ म्हणजे २००९ ते २०१० च्या दरम्यानचा काळ होता. त्यास सुमारास माझा दीर निलेश राजे, काही कोर्स संबंधी माझ्याकडे राहायला होता. तो त्याचे काम रात्ररात्र जागून करत असे व पहाटेला झोपत असे. त्याला पहाटेला कुणी बाथरूम मध्ये अंघोळ करतंय, किचनमध्ये सराईतपणे कुणी काम करतंय, भांड्यांचे आवाज तो अनुभवू लागला. एक दिवस सकाळी त्याने मला धीर करून सांगितले कि, “कीर्ती दररोज मला असे आवाज येतात, आधी मला वाटले कि तू उठत असशील, पण पहिले तर तू झोपलेली असतेस, मग हे आवाज कसे आणि कुठून येतात?” मग मी त्याला आपल्या बाबांविषयी सांगिले आणि आश्चर्य म्हणजे तोही बाबांचे अगदी मनोभावे करू लागला ते आजतागायत. मला एक गोष्ट नक्की माहिती आहे कि बाबांना ज्याला जवळ करायचे आहे त्याला बाबा कसेही खेचून आणतातच आणि ज्यांना नाही आणायचे ते यायला निघूनही अर्ध्यावाटेतूनही परत जातात.
तसाच माझा सख्खा धाकटा भाऊ निलेश सुळे ह्याच सुमारास म्हणजेच २००९ -१० ह्या काळात अत्यंत वाईट स्थितीत अडकला होता. आपण सुशिक्षित माणसं पटकन भूतबाधा, करणी, मंत्र तंत्र यावर विश्वास ठेवत नाही. पणत्यावेळी ज्यांनी ज्यांनी त्याला पाहिलं आहे त्या सगळ्यांना यावर विश्वास ठेवणं भाग पडले. त्यासर्वात प्रथम मी होते. एखाद्याच्या बुद्धीचा ताबा कसा मिळवला जातो, कसे एखाद्याला दिशाहीन बनवले जाते, विचाराची कुवत खुंटवली जाते, थोडक्यात माणूस माणूस म्हणून राहत नाही तर चालते बोलते शरीर रहाते ज्यात आत्माच नसतो ते फक्त दुसऱ्यांच्या विचारांवर चालते. सर्वात प्रथम तर आम्ही त्याला ओरडत असू कि, “काय तू मूर्खासारखं वागतो आहेस?” पण आमचं बोलणंसुद्धा त्याच्या मेंदूपर्यंत जात नसे. मग मी त्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यायला सांगितला पण काही फरक नाही. बरेच दिवस यातच चालले होते. तो एकेक वेगळंच काही सांगत होता, पण आमची बुद्धी मानायलाच तयार नव्हती. आमचं एकच तू प्रॅक्टिकल रहा. एक असाकाही प्रसंग घडला आणि आम्हाला या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवणे भाग पडले. हळूहळू बाबांचे मार्गदर्शन सुरु झाले. त्यावेळी अत्यंत कठीण प्रसंगातून फक्त तोच नाही तर माझे अख्खे कुटुंब जात होते. पण हार मानली नाही फक्त आणि फक्त बाबांच्या जीवावर. कित्येकदा माझ्या कुटुंबाच्या जीवावर बेतले. कधी माझ्या नवऱ्याच्या तर कधी माझ्या मुलींच्या. पण घाबरलो नाही कारण ताकद देणारे तेच होते. त्याचे सगळे उतरायला २-३ वर्षे गेली. पण आज तो सहीसलामत आहे. पूर्ववत झाला आहे. केवळ आणि केवळ फक्त बाबांनीच कृपा. त्यावेळी बाबा नसते तर माझा भाऊ वाचला तरी असता कि नाही कुणास ठाऊक? पण म्हणतात ना देव तरी त्याला कोण मारी.
हा असाच माझा आणि बाबांचा प्रवास चालू होता. मी बाबांना एकच प्रार्थना करत असे, “बाबा मला तुमची फक्त सेवा करायची आहे, भक्तीसाठी भक्ती करायची आहे, हात पसरले तर ते फक्त तुमच्यापुढे. माझ्या कुटुंबाचा भार तुम्ही वाहा.” आणि बाबा मनोमन हसत होते. “अगं हे कर, अगं हे करू नकोस”, अशी उत्तर देत होते. एकदातरी कशावरून तरी मी त्याच्यावर रागावले आणि म्हटले, “मी तुमच्याशी बोलणारच नाही”. झटकन उत्तर आले, “तू तर माझी बायजा आहेस, तू रुसलीस तर कसं होईल माझं?” त्यादिवशी ढसाढसा रडले. वाटलं आपली कुवत नसताना बाबा इतक्या जवळ आपल्याला घेतायेत! त्यादिवसापासून बाबांशी कधीच अबोला धरायचा नाही असे मनोमन ठरविले.
ऑक्टोबर २०१०, हे वर्ष माझ्यासाठी अत्यंत आनंददायी ठरले. ८ ऑक्टोबर २०१० नवरात्रात माझ्या घरात बाबांनी स्थान मागितले. आणि त्यांचे चंडीरूपात घरात आगमन झाले. त्यांना सगळं शृंगार केला. २१ लिंबाची माळ घातली साडी नेसवली. संकष्ट चंडिकाच बसली आहे असे दिसू लागले. त्या नऊ दिवसात अनेकजण दर्शनाला आले. त्याचेच एक गायिका आली होती जी गजल गायक होती. तिने मला विचारले कि, “मला बाबांची सेवा करायची आहे, तर माझ्या वाद्यवृंदाला घेऊन काही भजनं गाऊ का”? मी लगेच हो म्हटले. पंचमीचा दिवस ठरला. आम्ही सर्व भक्तजन संध्याकाळी जमलो. आम्ही साग्रसंगीत त्यांचे जेवण केले. यात मोठा वाट नुपूर आणि सुमुखचा होता. संध्याकाळी देवीरूप बाबांसमोर दिवे लावत असताना, “बाबांनी सांगितलं एक साडी चोळी काढ सुपात.” मी एवढंच म्हटलं कि, “बाबा तिला सांगायला विसरले कि जोगवा म्हण, पण आता जाऊ द्या, हवं तर मी म्हणेन सगळा कार्यक्रम झाल्यावर”. किती छोटी इच्छा होती माझी जोगव्याची! कारण माझे वडील अत्यंत देवभोळे होते आणि ते नवरात्रात नऊ दिवस घरात आरत्यांबरोबर जोगवा म्हणत असत. थोड्याच वेळात ती गायिका तिच्या वाद्यवृंदासहित घरी आली. आत येऊन मला बाजूला घेऊन म्हणाली, “मी तुम्हाला म्हटलं होतं भजनं गाईन पण मी सांगता मात्र जोगव्याने करीन, कारण आता निघायच्या आधी मी माझ्या गुरूंना पाय पडत असताना मला जोगवा सुचला, तो मी लिहिला आहे आणि तो मला इथे सादर करायचा आहे. तर तुमची काही हरकत नाहीय ना”. मी काहीच बोलले नाही, फक्त हसले. डोळे मात्र पाण्याने भरले, कारण माझ्या वडिलांची आठवण म्हणून जोगवा गाण्याची माझी इच्छा बाबांनी त्या गायिकेमार्फत पूर्ण केली होती. संपूर्ण कार्यक्रम झाला आणि शेवटी जोगवा इतका रंगला कि सगळे भान हरपून गेले. तेवढ्यात बाबांच्या परमभक्त असलेल्या सौ. संगीतावहिनी म्हणाल्या, “जोगवा म्हटल्यावर ओटी भरायची असते, तर आपण पटकन घेऊन येऊयात का?” त्यांना सांगितलं, “अहो हि सोय बाबांनी आधीच करून ठेवली आहे”. नवरात्रीचे नऊ दिवस एखाद्या आनंदोत्सवाप्रमाणे पार पडले. म्हटलं, “संपलं आता हे सगळे! परत उचलायचं! जागच्या जागी ठेवायचं.” पण मला कुठे माहिती होतं कि बाबा कायम स्वरूपी आले आहेत. दसऱ्याला स्थान हलवायला गेले तर, बाबांनी स्पष्ट सांगितलं, ” हे माझे कायमस्वरूपी पुण्यात स्थान झाले आहे. ते हलवायचे नाही. मी फक्त इथे भक्तांचे कल्याण करायला आलो आहे, आनंद वाटायला आलो आहे. यापुढे इथे दरवर्षी नवरात्र, माझा जन्मोत्सव साजरा होईल. तसेच माझे एक अंशात्मक स्थान UK ला होईल”. तेव्हातरी UK मध्ये कुणीच नव्हते. १३ एप्रिल २०११, बाबांचा पहिला उत्सव. तीन दिवस चाललेला हा उत्सव म्हणजे पर्वणीचं होती. १२ तारखेपासून पालन सजविण्यात आला होता. बरेचसे विधी करण्यात आले होते. घरात नुसता सगळ्यांच्या अंगात उत्साह संचारला होता. खूप मोठे मंगलकार्य घरात असल्यासारखे वाटत होते. पाळणा म्हणून बाबांचा जन्म साजरा केला गेला. हळूहळू लोक जमू लागले. कोणी बोलावलेले, तर कोणी अनोळखी. त्यातच ओळख झाली पहिल्यांदा डॉक्टर गौरव गुप्ते यांची. तेही बाबांकडे आले आणि दोघेही दाम्पत्य बाबांचे होऊन गेले. अशाप्रकारे पुण्यातला बाबांचा पहिला जन्मोत्सव अत्यंत आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
असेच बाबांचे तीन उत्सव छान पार पडले. भक्तगण वाढत गेले. आला तो बिनशर्त बाबांचा झाला. २०१३ साल उजाडले आणि पूर्णतः माझ्या विसमरणात गेलेली गोष्ट बाबा सारखी सारखी सांगू लागले. पण मी सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करत होते. बाबा सांगत होते, “मी तुला २०१३ साल हे नूपुरच्या लग्नासाठी सांगिलते होते, तिचे लग्न यावर्षी लाव.” पण मी बाबांना एकच उत्तर देत होते, “बाबा आताच तिचे शिक्षण संपलंय, थोडा वेळ द्या अजून, निदान आणखी एक दोन वर्षतरी”. एक दिवस अशीच एका अवलियाची गाठ पडली. ते शंकर महाराजांचे भक्त होते. अध्यात्मिक बैठक असलेले होते. त्यावेळी मी, नुपूर, सुमुख एकत्र होतो. नुपूर आणि सुमुखकडे पहाताक्षणी ते म्हणाले, “का थांबली आहेस? पहिले यांचे लग्न लाव, उशीर करू नकोस”. मी नुसताच मानेने होकार दिला. त्यानंतर वारंवार अशा व्यक्ती संपर्कात येतं गेल्या कि त्या एकाच सांगत असत, “पहिले यांचे लग्न लाव”. का? ते मात्र कुणीच सांगत नसे. एक दिवस नृसिंहाची साधना करणारे भक्तीमार्गात, अध्यात्मिकमार्गात, बैठक पक्की असणारे एक आमचे स्नेही काका भेटले. त्यांचे आणि आमचे खूप घनिष्ट कौटुंबिक संबंध होते. ज्याक्षणी त्यांनी नुपूर आणि सुमुखला पहिले, त्याक्षणी तेही एकच म्हटले, “ह्यांचे लग्न कर, आधीच खूप उशीर झाला आहे”. बाबांचे शब्द आता मात्र कानात सारखे घुमू लागले. हळूहळू ह्या गोष्टीचे गांभीर्य लक्षात येऊ लागले होते.
एकदिवस एका सकाळी माझ्या मोठ्या बहिणीचा सौ. स्वाती टिपणीस हीच फोन आला म्हणाली, “मी आणि माझी एक मैत्रीण शंकर महाराजांच्या दर्शनाला पुण्यात उदय नयेत आहोत.” ती पुण्यात आपल्या शहरात येते म्हटल्यावर मी त्या दोघींनाही माझ्या घरी जेवावयास बोलावले आणि बाबांच्या नियोजनाची चक्रे इकडून फिरायला सुरुवात झाली. त्या दोघीही माझ्या घरी आल्या, जेवल्या. आमच्या छान गप्पा झाल्या. बहिणीची मैत्रीण हि स्वामीभक्त असल्यामुळे अध्यात्मिक गप्पा झाल्या. आल्याआल्या तिने माझ्याकडील बाबांच्या मूर्तीला मिठी मारली. म्हणाली, “बाबा जणू मला बोलावताहेत.” त्या बहिणीच्या मैत्रिणीचे नाव होते. सौ. वैशाली मराठे. माझ्यापेक्षा वयाने बऱ्याच मोठ्या असलेल्या वैशालीताई खूप प्रेमळ भासल्या. मग कधीतरी मध्येच त्यांचे मला फोन येतं असत. आणि त्या विचारीत, “अगं आज तू बाबांना पिवळ्या रंगाचे वस्त्र घातले आहेस का? कारण पूजा करताना मला बाबा पिवळ्या वस्त्रात दिसत आहेत.” आणि खरोखरी मी बाबांना पिवळ्या रंगाचे वस्त्र घातलेले असे. हळूहळू मी बाबांना काही म्हटले कि त्या फोन करून तसेच्या तसे मला विचारीत असत. माझा विश्वास हळूहळू त्यांच्यावर बसू लागला.
कित्येक वेळा मी इथे दाखविलेला नैवेद्य ठाण्याला त्यांच्या घरी त्यांना कळत असे आणि त्या तसे मला सांगत असत. एक दिवस तर मला बाबांनी आश्चर्याचा धक्काच दिला. मी बाहेर जाण्यासाठी कपात उघडले ड्रेस काढला आणि सहज घरातील एखाद्या व्यक्तीला म्हणावे तसे म्हटले कि बाबा माझ्याकडे सगळ्या रंगाचे ड्रेस आहेत फक्त गुलाबी रंग नाही. आताना मी गुलाबी रंगाचा ड्रेस शिवीन.” बस्स इतकेच. चारच दिवसांनी वैशाली ताई माझ्याकडे पुण्याला आल्या. बाबांना वाहण्यासाठी बरेच काही घेऊन आल्या होत्या. सर्व साग्रसंगीत झाल्यावर मला म्हणाल्या, ” बस इथे मला तुझी ओटी भरण्याची आहे, का ते विचारू नकोस. फक्त एकच गोष्ट सांगते कि ओटी ड्रेसच्या कापडाने भरणार आहे मी. कारण बाबा मला म्हणाले तिची ओटी भर. म्हणून मी हिरवी साडी आणण्यासाठी निघणार तर बाबा म्हणाले गुलाबी रंगाने भर. म्हणून गुलाबी साडीचा विचार केला. तर म्हणाले ड्रेसच्या कापडाने भर. जशी बाबांची इच्छा म्हणून मी हे गुलाबी रंगाचे ड्रेसमटेरिअल तुझ्यासाठी आणले आहे.” मला काय बोलावे कळत नव्हते. निशःब्द मी त्यांच्याकडे आणि बाबांकडे बघत उभी होते. ओटी नाकारूही शकत नव्हते. बाबा त्यांच्याजवळही क्षण क्षणाला होते याचा प्रत्यय त्याच्याचकरवी बाबा मला देत होते आणि विश्वास बसवत होते. कारण बाबांना पुढे खूप मोठा निर्णय वैशालीताईनंकरवी द्यायचा होता. सर्व त्यांचेच नियोजन. आणि तेही का तर आमच्याच कल्याणासाठी.
एक दिवस गुरुवारची माझ्या घरी आरती चालू होती. माझ्या विहीणबाई घरात शिरल्या शिरल्या म्हणाल्या, “घरात चाफ्याच्या फुलांचा घमघमाट सुटला आहे.” परंतु तोवर बाबांना कुणीही चाफा वाहिला नव्हता. आरती सुरु झाली आणि जणू माझ्या नाकासमोर खिचडी धारावी इतका घमघमाट आला. आरती करताना मी डोळे उघडून पाहिलं तर खिचडी नव्हतीच. आरती झाल्यावर सौ. संगीतावहिनी म्हणाल्या, “मला अखंड बेसनाचा वास येतं होता.” पण त्यापैकी काहीही नव्हते. थोड्याच वेळात माझा फोन वाजला आणि समोरून वैशाली ताई बोलत होत्या. त्यावेळी माझी मावस बहीण सौ. शलाका कुलकर्णी हिच्याकडे स्वामींची आरती दरगुरूवारी होतं असे. आणि वैशाली ताई तिथे जात असत.
कित्येक वेळा मी इथे दाखविलेला नैवेद्य ठाण्याला त्यांच्या घरी त्यांना कळत असे आणि त्या तसे मला सांगत असत. एक दिवस तर मला बाबांनी आश्चर्याचा धक्काच दिला. मी बाहेर जाण्यासाठी कपात उघडले ड्रेस काढला आणि सहज घरातील एखाद्या व्यक्तीला म्हणावे तसे म्हटले कि बाबा माझ्याकडे सगळ्या रंगाचे ड्रेस आहेत फक्त गुलाबी रंग नाही. आताना मी गुलाबी रंगाचा ड्रेस शिवीन.” बस्स इतकेच. चारच दिवसांनी वैशाली ताई माझ्याकडे पुण्याला आल्या. बाबांना वाहण्यासाठी बरेच काही घेऊन आल्या होत्या. सर्व साग्रसंगीत झाल्यावर मला म्हणाल्या, ” बस इथे मला तुझी ओटी भरण्याची आहे, का ते विचारू नकोस. फक्त एकच गोष्ट सांगते कि ओटी ड्रेसच्या कापडाने भरणार आहे मी. कारण बाबा मला म्हणाले तिची ओटी भर. म्हणून मी हिरवी साडी आणण्यासाठी निघणार तर बाबा म्हणाले गुलाबी रंगाने भर. म्हणून गुलाबी साडीचा विचार केला. तर म्हणाले ड्रेसच्या कापडाने भर. जशी बाबांची इच्छा म्हणून मी हे गुलाबी रंगाचे ड्रेसमटेरिअल तुझ्यासाठी आणले आहे.” मला काय बोलावे कळत नव्हते. निशःब्द मी त्यांच्याकडे आणि बाबांकडे बघत उभी होते. ओटी नाकारूही शकत नव्हते. बाबा त्यांच्याजवळही क्षण क्षणाला होते याचा प्रत्यय त्याच्याचकरवी बाबा मला देत होते आणि विश्वास बसवत होते. कारण बाबांना पुढे खूप मोठा निर्णय वैशालीताईनंकरवी द्यायचा होता. सर्व त्यांचेच नियोजन. आणि तेही का तर आमच्याच कल्याणासाठी.
एक दिवस गुरुवारची माझ्या घरी आरती चालू होती. माझ्या विहीणबाई घरात शिरल्या शिरल्या म्हणाल्या, “घरात चाफ्याच्या फुलांचा घमघमाट सुटला आहे.” परंतु तोवर बाबांना कुणीही चाफा वाहिला नव्हता. आरती सुरु झाली आणि जणू माझ्या नाकासमोर खिचडी धारावी इतका घमघमाट आला. आरती करताना मी डोळे उघडून पाहिलं तर खिचडी नव्हतीच. आरती झाल्यावर सौ. संगीतावहिनी म्हणाल्या, “मला अखंड बेसनाचा वास येतं होता.” पण त्यापैकी काहीही नव्हते. थोड्याच वेळात माझा फोन वाजला आणि समोरून वैशाली ताई बोलत होत्या. त्यावेळी माझी मावस बहीण सौ. शलाका कुलकर्णी हिच्याकडे स्वामींची आरती दरगुरूवारी होतं असे. आणि वैशाली ताई तिथे जात असत. त्यादिवशी त्यांनी फोन यासाठी केला होता कि त्यांना बाबांनी चाफ्याची फुले घ्यायला लावली आणि ती आरती सुरु व्हायच्या आधी तिथे वाहायला लावली. इथे घडलेला प्रकार मी त्यांना सांगितला कि, “तुमची चाफ्याची फुलं बाबांपर्यंत पोहोचली. कारण तो वास माझ्या विहीणबाईंना आला. पण बाकीच्या सुगंधांचे कारण कळले नाही.” त्यावर त्या हसून म्हणाल्या, “शलाकाने तिथे स्वामींपुढे खिचडी ठेवली होती, आणि तुझ्या मावशीने बेसन लाडू!” सगळ्याचा उलगडा झाला. हळूहळू आम्ही बाबांमुळे बांधल्या गेलो. २०१४ जानेवारी. एक दिवस अचानक त्यांचा फोन आला आणि म्हणाल्या, “अगं तू नुपूरचं लग्न जमवलं आहे का?” मी म्हटलं, “तिने जमवलं आहे.” त्यावर त्या म्हणाल्या गेले काही महिने मला बाबा येऊन सांगत आहेत कि, “कीर्तीला समजावं नुपूरचं लग्न कर. ती माझा ऐकत नाही. निदान मे महिन्यापर्यंत तरी कर”. मी परत नुसतीच होकारार्थी मान हलवली. पण मनात चलबिचल सुरु झाली कारण त्यांना खोटे ठरवणे आता शक्यच नव्हते. असे त्यांचे मला सारखे फोन येऊ लागले व त्या मला समजावू लागल्या, “अगं एवढे गुरु तुला साक्षात सांगत आहेत त्यांचे गांभीर्य लक्षात घे.” असे २ महिने गेले आणि बाबांच्या उत्सवाचा दिवस उजाडला. १३ एप्रिल, २०१४. घरात माणसांची वर्दळ सुरु झाली, काकड आरती सुरु झाली. घरात मंगलमय वातावरण होते. काकड आरती झाल्यावर सौ. संगितावाहिनी आल्या व हळूच मला म्हणाल्या, “मी नूपुरला चुडा दिला तर तुम्हाला चालेल का? मला का कुणास ठाऊक पण आज तिला चुडा द्यावासा वाटतोय.” म्हटलं खुशाल द्या. ज्या वेळी मी तिचे लग्न करीन तेव्हा हा चुडा नक्कीच तिच्या हातात घालीन. त्यांनी ताबडतोब जाऊन चुडा आणला आणि ताबडतोब तो तिला दिला.
महाआरतीच्या वेळी वैशाली ताई घरात आल्या आणि आल्या त्याच त्या सरळ बाबांसमोर येऊन बसल्या. नुपूरला व मला त्यांनी आतमध्ये बोलावले. त्याच वेळी बाबां समोर डॉ. गुप्ते ध्यानस्त बसले होते. वैशाली ताईंनी नूपुरला मांडीत बसायला सांगितले. वैशाली ताई तिच्या अंगावरून हात फिरवत म्हणाल्या,”आज पासून तुला ५ दिवसांची मुदत देत आहे. ५ दिवसांच्या आत नुपूरचे लग्न लागले गेलेच पाहिजे. त्या वेळी त्यांचा नूर काही वेगळाच होता. चेहर्या वरचे भाव अगदी गंभीर पण तेजस्वी दिसत होते. मला काय करावे कळेना. वळून डॉ. गुप्त्यां कडे पहिले. क्षणाचाही विलंब ना करता ते म्हणाले कि,”गुरु आज्ञा आहे ती ऐकलीच पाहिजे.” मी मंगेश, सुमुख, माझा दीर निलेश ह्यांना आत बोलावले आणि सांगितले. तिघेही तयार झाले. म्हणाले बाबांच्या शब्द पुढे आपण नाही. तिचे आयुष्य जास्त महत्वाचे. तरीही माझे मन तयार होईना. त्यावेळी त्या म्हणाल्या,”तू फक्त हो म्हण पुढील सर्व बाबा बघतील हा त्यांचा शब्द आहे तुला. ना ऐकण्याचा करंटे पण करू नकोस.” एका क्षणात करीन लागणे नुपूरचे ह्याच ५ दिवसात. पण पुढे काय? त्या उत्सवाला नेमक्या माझा विहीण बाई आल्या नव्हत्या. त्यांना सुमुखाने फोन करून सांगितले आणि विचारले काय करायचे? क्षणाचाही विलंब लावता त्या म्हणाल्या बाबांच्या शब्द पुढे आपण नाही. लग्न करायचेच. झाले त्याच दिवशी १६ एप्रिल, २०१४ तारीख ठरवण्यात आली. मंगेश, माझे पती ह्यांना म्हटलं तुम्ही आपल्या नातेवाईकांना फोन करून सांगा. मी माझा माहेरी करते. कारण आता हातात वेळ फार कमी होता. धाकटा भाऊ बोटीवर होता. तो १४ एप्रिल ला आला. त्याचा साठी हा धक्काच होता. मोठ्या बहिणीला फोन केला आणि सांगितले कि नूरचे लग्न करत आहे. ती व तिचे पती दुसऱ्याच दिवशी ताबडतोब हजर झाले. सुमुखाची आई, आजी, माझे सासरे, नूपुरच्या मैत्रिणी सारे हजर झाले. काय काय करायचे ते फक्त सांगा. त्या वेळी श्री. मिलिंद गुप्ते आणि कुटुंबाची फार मोठी मोलाची मदत झाली. आयत्या वेळचे भटजी हि बाबांनीच उभे केले. हॉल मिळाला. पायघड्यां पासून ते कन्यादानाचे भांड्यांपर्यंत सर्व काही सौ. संगिता वाहिनी व कुटुंबीयांनी पाहिले. हॉल मध्ये फुलांच्या माळा, रुखवताची टेबल, रांगोळ्या सर्व काही ह्याच कुटुंबाने पहिले.
नूपुरच्या मैत्रिणींनी मेंदी वाले घरी आणले. आमच्या सर्वांच्या हातांवर साग्रसंगीत मेंदी झाली. मुलींची रात्रीची पार्टी झाली, नाचगाणी झाली. बघता बघता घर हे लग्न घर वाटू लागले. सर्व काही खरेदी झाली. विहिणीच्या तोंड धुण्या पासून ते जेवण नंतरच्या चांदीच्या लवंगे पर्यंत सर्व काही झाले. सगळं सगळं झाले.
नुपूर व तिची मैत्रीण पूजा चुडा भरायला गेल्या कारण दुसऱ्या दिवशी हळद लागणार होती. आधी हळद लावली असती तर बाहेरची कामे करता आली नसती. म्हणून लग्नाच्याच दिवशीच हळद लावायचे ठरले. चुडा मात्र संगिता वाहिनी उत्सवाला दिलेलाच भरायला गेल्या. काय बाबांचे नियोजन होते बघा. बांगडी वाल्याने नूपुरला विचारले तू नवरी आहेस? तुला चुडा भरायचा आहे? तुझी हळद झालीये का? त्यावर नुपूरने सांगितले हळद उद्या लागणार आहे. त्याने एक यादी नुपूरचा हातात दिली. आणि हे आन सांगितले. त्याने दुकानात त्याचा देवा समोर साग्रसंगीत कलश सकट विधिवत पूजा मंडळी. भरभरून आशीर्वाद दिले. देवाला पाया पडायला सांगितले आणि मग तिच्या हातात चुडा भरला. एवढा उशीर का होतो म्हणून मी विचारणा केल्यावर हा वृत्तांत मला समजला. ह्याचे त्याने कुठलेही अतिरिक्त पैसे घेतले नाहीत ना तिचे होई पर्यंत एकही गिर्हाईकाला त्याने दुकानात घेतले नाही.
सकाळी सनईच्या मंगलमय सुरात नुपूरची हळद, देव देवक पार पडले. हॉल वर पोहोचलो तर श्री व सौ गुप्ते कुटुंबीयांची जय्यत तयारी पाहून क्षणभर डोळ्यात पाणी आले. हॉल वर पहिले तर मामा मामी प्राजक्ता सगळ्यांना पाहून भरून आले. कारण ह्यांचाशी काही माझे फारसे बोलणे झाले नव्हते. तसेच माझी नणंद सौ. मेघा व साहिल हॉल मध्ये हसत मुखाने सामोरे आले. मनोमन खूप खूप सुखावले. मंगेशचे मित्र, नूपुरच्या मैत्रिणी, सुमुखाचे मामा मामी, भाऊ , सुमुखचा मित्र आमंत्रणाची वाट न बघता हजार होते. पण सौ. वैशाली ताई दिसल्या नाहीत म्हणून फोन लावला पण उचलला नाही.
होम हवन, कन्यादान, सप्तपदी, व्याहीभेत, सून मुख असे सर्व विधी सुंदर रित्या पार पडले. सद्गुरूच्या इचछेने आता चि. नुपूर सौ. नुपूर सुमुख झाली आणि माझा फोन वाजला. समोरून सौ. वैशाली ताईंचा फोन,”नुपूरचे लग्न अत्यंत सुंदर रित्या पार पडले. मी आले नाही ह्याचे कारण बाबांनी मला त्यांचा पोथीचे पारायण नुपूर साठी करायला सांगितले होते. त्याची आजच्या दिवशी समाप्ती करायची होती. हे तुला सांगायचे हि नव्हते. म्हणून मी लग्नला उपस्थित राहिले नाही. कोण कुठल्या वैशाली ताई माझा कडे येतात आणि बाबा त्यांना हाताशी धरून आधी माझा विश्वास बसवतात आणि मग बाबा त्यांचा निर्णय वैशाली ताईनं मार्फत देतात. का? तर फक्त आणि फक्त माझ्या कुटुंबियांच्या कल्याण साठीच. मला दिलेला शब्द ते पाळतात. आणि मी मात्र शंका कुशंकांच्या फेऱ्यात अडकून बसलेली. कोण कुठला बांगडीवाला जो माझा मुली साठी कुठलाही स्वतःचा स्वार्थ न पाहता विधिवत चुडा भरतो व त्यांचे पैसेही घेत नाही. प्रत्येकाला बाबांनीच सामर्थ्य व बुद्धी दिली व पाठीशी ठामपणे उभे केले. केवढी हि करून, केव्हढे हे अकारण कारुण्य… केवळ ४८ तासात साग्रसंगीत लग्न माझ्या बाबांनी पार पाडले. कशाचीही कमतरता न ठेवता. ज्या लग्नाची सामान्य लोक निदान वर्षभर आधी तयारी करतात. ताकद देणारे हि तेच, माणसे उभे करणारे हि तेच, येणारी माणसे हि त्यांचीच. ह्या लग्नाचे साक्षीदार होणे म्हणजे भाग्याचेच म्हटले पाहिजे. कारण सगळेच अघटित, चमत्कारांनी भरलेले आणि आज म्हणूनच हा अनुभव येथे सांगितला आहे कि सद्गुरूची कृपा असेल तर अशक्य ते शक्य काही होऊ शकते आणि ह्या साठी मी बाबांची शतशः ऋणी आहे.
१३ एप्रिल, २०१७ हा मागील उत्सव हा सुद्धा खूप महत्वाचा होता. कारण ह्या वेळी बाबांनी आदल्या दिवशी आमच्या कडून दत्ताचा होम करून घेतला आणि डॉ. गौरव गुप्ते ह्यांना बाबांच्या ७ छोट्या मुर्त्या बनवायला सांगितल्या. कारण त्यांची बरेच वर्षे उच्च होती मूर्ती बनवण्याची पण बाबांच्या उसाचे शिवाय नाही म्हणून आम्ही थांबलो. मात्र २०१७ च्या उत्सवाला मुर्त्या बनवल्या व त्यांची विधिवत पहाटे पूजा केली. ६ मुर्त्या कुणाला द्यायचा हे ठरले होते. पण ७वी मूर्ती उत्सवाला आरतीच्या वेळी ठरली. जो माझा भाऊ श्री. राहुल चिटणीस ह्याचा कडे दिली. पहिल्या उत्सवाला सांगितलेले ७ वर्षात डोक्यातून निघूनही गेले होते कि माझे एक औंशात्मक रूप U.K. मध्ये असेल. पण निलेश, माझा सख्खा धाकटा भाऊ ह्याला आठवले व मला म्हणाला डायरी काढून वाच बाबांनी आधीच सांगून ठेवले आहे पण तू विसरलीस. पण त्या वेळी राहुल ठाण्यातच होता नंतर तो U.K. ला गेला. पण बाबांचे किती आधीपासूनच हेय नियोजन होते.
तिचे येणाऱ्या प्रत्येकाला बाबांनी काही न काही दिलेच आहे. कुणाला मागून तर कुणाला न मागता. पण, एक मात्र नक्की. जे दिले ते त्यांचाच इचछेने. बाबा म्हणतात,”इथे येणारे भक्त हे माझं कुटुंब आहे आणि इथे येणारा प्रत्येक भक्त माझ्या गळ्यातील माळेचे मणी आहेत.” आणि खरंच कुटुंब प्रमुखा प्रमाणे ते प्रत्येकाची काळजी घेतात. एक गोष्ट मला इथे फार आवर्जून सांगावीशी वाटते कि इथे येणारा प्रत्येक भक्त हा बाबांच्या प्रेम पोटीच येतो. लिन होऊन येतो. इथे कुणाच्यातही अहंभाव नाही. सगळेच एक मेकांच्या सल्ल्या नुसार, मतं नुसार नाती जपत वागतात. एका कुटुंबाप्रमाणे राहतात. बाबांचा शब्द झेलतात. उत्सव असो, नवरात्र असो, गुरु पौर्णिमा असो सगळे आपले पानाच्या भावनेने साजरे करतात.
आणि म्हणूनच आज मी मुद्दामहून स्थान झाल्या पासून ते आज पर्यंतचा माझा प्रवास इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
माझी बाबांना कळकळीची प्रार्थना आहे कि हा देह कायम तुमच्याच सेवेत असू द्या. बापू म्हणतात तसे,
|| जे जे मजसाठी उचित, तेचि तू देशील खचित||
|| हे मात्र मी नक्की जाणित, नाही तक्रार राघवा||
|| अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सद्गुरू श्री अनंतप्रभू महाराज की जय||
|| किशोरी माते की जय ||
|| जय जानकी दुर्गेश्वरी ||
– सौ. कीर्ती दोंदे, पुणे