देवबाबांची आरती

आरती करितो देवबाबा आम्हा तू तारी,
आरती करितो देवबाबा आम्हा तू तारी
पाजुनिया भक्तां देवा भक्तीचे वारी ll धृ ll आरती॰॰॰

कार्य कराया कल्याणाचे होशी अवतारी
नेणती तुजला म्हणुनी गणती मानव साचारी ll १ ll आरती॰॰॰

नाथ पंथ तो धन्य कराया धरिसी करी झोळी
त्यागुनिया वस्त्रा देवा पापाची होळी ll २ ll आरती॰॰॰

काम क्रोध हे जाळुनी सखया उद्धारसी सकला
अनंत देव झाला बाबा साई खरं भोळा ll ३ ll आरती॰॰॰

आरती करिता ध्यान पहाता काय दिसे डोळा
नारायण तो विकल होऊनी घेई पदी लोळा ll ४ ll

आरती करितो, आरती करितो, आरती करितो
देवबाबा आम्हा तू तारी॰॰॰॰